मुंबई, 23 फेब्रुवारी- बॉलिवूड-हॉलिवूड (Bollywood & Hollywood) अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अलीकडेच, एका लेकीची आई बनलेली अभिनेत्री पती निक जोनससोबत (Nick Jonas) कुठेतरी जात होती. तेव्हा तिची भेट यूएस कॉमेडियन रोझी ओडोनेलशी (Us comedian Rosie O’Donnell) झाली. जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा रोझी असे काही बोलली की ज्यामुळे तिला देसी गर्ल प्रियांका चोप्राची माफी मागावी लागली. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण . अमेरिकन कॉमेडियन रोझी ओडोनेल एका व्हिडिओमध्ये बॉलिवूड-हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत झालेल्या भेटीचा संदर्भ देत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोझीने अभिनेत्रीची माफी मागितली आहे. तिच्या कारमध्ये बसून रोझीने एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे की, ‘मी माझा मुलगा,आणि त्याच्या गर्लफ्रेंडने निक जोनसला आपल्या शेजारी पाहिले, जो त्याची पत्नी चोप्रासोबत होता.तिला मी दीपक चोप्राची मुलगी समजत होते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दीपक चोप्रा हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. जे अमेरिकेत खूप लोकप्रिय आहेत. रोझी ओडोनेल पुढे म्हणते, ‘मी निक जोनसला हाय म्हटलं आणि प्रियांकाला म्हटलं की, मी तुझ्या वडिलांना ओळखते. यावर ती म्हणाली अरे खरच? माझे बाबा कोण आहेत? मी म्हटलं दीपक. ती म्हणाली नाही, चोप्रा आडनाव कॉमन आहे. मला खूप लाज वाटली. रोझी पुढे विचारते, ‘मी एकटीच आहे का जिला प्रियंका दीपकची मुलगी आहे’ असे वाटले.
त्यांनतर, एका व्हिडिओमध्ये रोझी ओडोनेल सांगत आहे की, ‘लोकांच्या कमेंट्स पाहिल्या. ज्यामध्ये मी चुकून निक जोनस आणि त्याची पत्नी प्रियांका चोप्रा यांना दीपकची मुलगी असल्याचे सांगितले. लोकांना मी असभ्य वाटली असेल. पण तसं नव्हतं. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि माझ्यापेक्षा खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे सुरुवातीला त्यांना हे विचित्र वाटलं असावं. असं मला वाटतं. माफ करा, मी कधीकधी गोंधळ करते, मी त्याबद्दल माफी मागते’. असं म्हणत या कॉमेडियनने दिलगिरी व्यक्त केली आहे.
प्रियांका चोप्राच्या वडिलांचे नाव अशोक चोप्रा आणि आईचे नाव मधु चोप्रा आहे. प्रियांकाचे वडील लष्करात डॉक्टर होते. ते आता या जगात नाहीत. प्रियांका अनेकदा तिची आई मधुसोबत वेळ घालवताना दिसून येते. त्यांचे बरेच फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.