Home /News /entertainment /

उर्वशीनं बिग बॉस फेम गौतम गुलाटीशी केलं लग्न? काय आहे Viral Photo चं सत्य

उर्वशीनं बिग बॉस फेम गौतम गुलाटीशी केलं लग्न? काय आहे Viral Photo चं सत्य

अभिनेता गौतम गुलाटीनं लग्नाचा हा फोटो स्वतः इस्टाग्रामवर शेअर केला आहे.

    मुंबई, 4 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि आणि अभिनेता गौतम गुलाटी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यावर त्यांचे चाहते गोंधळले आहेत. कारण या फोटोमध्ये उर्वशी नवरीच्या वेशात दिसत आहे. तर गौतम शेरवानीमध्ये दिसत आहे. हे दोघंही या फोटोमध्ये अग्नीच्या साक्षीनं फेरे घेताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंमुळे त्या दोघांनी लग्न केल्याचा अंदाज लावला जात आहे. अभिनेता गौतम गुलाटीनं त्याच्या इस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर सर्वच हैराण झाले आहेत. गौतमनं हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शादी मुबारक नहीं बोलेगे?' गौतमच्या या पोस्टमुळे सर्वच चाहते गोंधळलेले आहेत. हा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.
    सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो उर्वशी आणि गौतम यांची आगामी वेब सीरिज 'वर्जिन भानुप्रिया'मधील आहे. ही वेब सीरिज लवकरच Zee5 वर रिलीज होणार आहे. यामध्ये गौतम आणि उर्वशीच्या प्रमुख भूमिका आहेत. उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर केला होता. ज्याचा व्हिडीओ 16 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या ट्रेलरनंतर या वेब सीरिज बाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
    First published:

    Tags: Bollywood, Urvashi rautela

    पुढील बातम्या