जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urmila Kothare: 'आयुष्यात असे काही क्षण येतात', नेमकं कशाबाबत बोलतेय उर्मिला?

Urmila Kothare: 'आयुष्यात असे काही क्षण येतात', नेमकं कशाबाबत बोलतेय उर्मिला?

Urmila Kothare: 'आयुष्यात असे काही क्षण येतात', नेमकं कशाबाबत बोलतेय उर्मिला?

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेने छोट्या पडद्यासह आता मोठ्या पडद्यावरही पुनरागमन केलं आहे. ‘एकदा काय झालं’च्या माध्यमातून अभिनेत्री पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,17 जुलै-  मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेने छोट्या पडद्यासह आता मोठ्या पडद्यावरही पुनरागमन केलं आहे. ‘एकदा काय झालं’च्या माध्यमातून अभिनेत्री पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे. लेकी जिजाच्या जन्मानंतरचा उर्मिलाचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसहच अभिनेत्रीसुद्धा प्रचंड उत्सुक आहे. हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहांमध्ये दाखवलं होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचं एक सुंदर गाणं रिलीज झालं आहे.याच पार्श्ववभूमीवर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. ती सतत काही ना काही पोस्ट करत चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या लेकीच्या फारच जवळ आहे. तिच्या लेकीचं नाव ‘जिजा’ असं आहे. या दोघी सतत धम्माल करतांना दिसून येतात.जिजासुद्धा आपल्या आईसोबत विविध सुंदर सुंदर व्हिडीओ बनवत असते. आज उर्मिलाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये उर्मिला आणि जिजा यांच्या विविध फोटोंचा कोलाज दिसून येत आहे. ही पोस्ट शेअर करत उर्मिलाने लिहलंय, ‘‘आयुष्यात असे काही क्षण येतात, जे प्रत्येकालाच थांबून राहावेत असं वाटत राहातं… ‘एकदा काय झालं!!’ या माझ्या आगामी चित्रपटातील ‘रे क्षणा’ हे गाणं नक्की बघा’. हे गाणं सध्या प्रचंड पसंत केलं जात आहे. हे गाणं लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी गायिलं आहे. **(हे वाचा:** ‘काहीतरी असं द्यायचं होतं जे..’, Man Udu Udu Jhala च्या टीमला सानिकाने दिलं हटके गिफ्ट )

जाहिरात

दरम्यान उर्मिलाने कित्येक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीची ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. त्यामुळेच मालिका टीआरपी रेसमध्ये टॉप 10 च्या यादीत समाविष्ट झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात