मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Urfi Javed: फॅशनच्या नादात उर्फीसोबत घडलं भलतंच;अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे आयब्रोजच झाले गायब

Urfi Javed: फॅशनच्या नादात उर्फीसोबत घडलं भलतंच;अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरचे आयब्रोजच झाले गायब

उर्फी जावेद

उर्फी जावेद

Urfi Javed New Look: 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद आपल्या अभिनयापेक्षा जास्त आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री इतक्या हटके स्टाईल कॅरी करते की भलेभले थक्क होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 23 फेब्रुवारी- 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद आपल्या अभिनयापेक्षा जास्त आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री इतक्या हटके स्टाईल कॅरी करते की भलेभले थक्क होतात. बऱ्याचवेळा आपल्या बोल्डनेसमुळे उर्फी ट्रोलदेखील होते. परंतु तिला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही, उर्फी नेहमीच आपल्या अंदाजात अतरंगी ड्रेस परिधान करत असते. ही अभिनेत्री कधी कोणत्या गोष्टीपासून ड्रेस तयार करेल याचा नेम नाही. मात्र आता अभिनेत्री ड्रेस नव्हे तर आपल्या मेकअपमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी जावेद आपल्या अतरंगी अंदजासाठी ओळखली जाते. उर्फी जावेद नेहमीच आपल्या कपड्यांमुळे चर्चेत आलेलं आपण पाहिलं आहे. मात्र आज अभिनेत्री आपल्या मेकअपमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने बार्बी डॉलसारखा मेकअप केला आहे. मात्र अभिनेत्रीला निरखून पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे आयब्रोजच गायब झालेले दिसून येत आहेत. पाहूया काय आहे नेमका प्रकार.

(हे वाचा: Sachin Shroff: कोण आहे Taarak Mehtaची पहिली पत्नी जुही परमार? धक्कादायक आहे घटस्फोटाचं कारण)

अभिनेत्री उर्फी जावेदचे अनेक व्हिडीओ स्ट्स्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर उर्फीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पापाराझी उर्फीला क्युटी असं म्हणत आहेत. कारण अभिनेत्रीने अगदी बाहुलीसारखा मेकअप केलेला आहे. मात्र अभिनेत्रीचा चेहरा पहिल्यानंतर काहीतरी चुकल्यासारखं जाणवतं. आणि लक्ष देऊन पहिल्यानंतर लक्षात आलं की उर्फीचे आयब्रोजच दिसत नाहीयेत.

खरं सांगायचं तर, उर्फी जावेदने आपले आयब्रोज ब्लिच केले आहेत. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरून आयब्रोज गायब झाल्यासारखे दिसत आहेत. उर्फी पुन्हा एकदा आपल्या अतरंगी अंदाजाने चर्चेत आली आहे.उर्फीच्या या लूकवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तर आयब्रोज शिवाय चेहरा भीतीदायक दिसत असल्याचं म्हटलं आहे.

उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.. ती सतत आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे ती अनेकवेळा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. दरम्यान राजकीय महिला नेत्यांनीही उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. परंतु तरीही उर्फी आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजात वावरताना दिसून येते.

First published:
top videos

    Tags: Bigg Boss OTT, Entertainment, Tv actress