Video : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे?

व्हाइस इंडिया या युट्युब चॅनेलवर श से शूटर हा नवा एपिसोड लाँच झालाय. उत्तर प्रदेशमधल्या गुन्ह्यांचं दर्शन यात होतं.

News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2018 06:14 PM IST

Video : श से शूटर, का बनतायत गुन्हेगार, कसे घडतात गुन्हे?

मुंबई, 11 डिसेंबर : युट्युबवरचं व्हाइस इंडिया हे चॅनेल भारतामधली गुन्हेगारी दाखवतं. क से क्राइममधला दुसरा एपिसोड श से शूटर नुकताच लाँच झाला. या चॅनेलवर सहा भागांच्या क्राइम सीरिज आहेत. अमॅझाॅन प्राइमवरच्या मिर्झापूरवरून या शोनं प्रेरणा घेतलीय.


यातला एक एपिसोड आहे श से शूटर. त्याला आवाज दिलीय अभिनेता विजय राजनं. रस्त्यावर भुरट्या चोऱ्या करणारा शार्प शूटर कसा बनतो, हे यात पाहायला मिळतंय. विशेष करून उत्तर प्रदेशमधल्या शूटर्सच्या कहाण्या आपल्याला या सीरिजमध्ये दिसतात.Loading...

श से शूटरनंतर जे एपिसोड्स रिलीज होणार आहेत, ते उत्तर प्रदेशमधल्या गुन्ह्यांचे अनेक पैलू दाखवतात. यानंतर ग से गँग, औ से औजार, फ से फरारी आणि स से स्मगलिंग असे एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत.


व्हाइस इंडियाच्या कन्टेंट हेड समिरा कन्वर म्हणाल्या, 'व्हाइस गुन्हेगारीवर प्रकाशझोत टाकतं. आम्ही यावर खूप संशोधन करतोय. भारतात कुठला विषय महत्त्वाचा ठरेल यावरही आम्ही संशोधन करतोय. खरंखुरं चित्र उभं करण्यासाठी आम्ही गुन्ह्यांची सुरुवात कशी आणि का झाली इथपासूनच दाखवतोय.'


व्हाइस इंडिया ही मीडिया कंपनी आहे. स्क्रीप्ट, सिनेमा, बातम्या, टीव्हीसाठी सांस्कृतिक कार्यक्रम बनवणं ही कामं कंपनी करते. 1994मध्ये व्हाइसची सुरुवात झाली. जगभर डिजिटल, मोबाईलवर व्हाइस दिसतं. व्हाइसवरच्या शोजना अनेक पुरस्कार मिळालेत.


अवधूत गुप्ते-स्पृहा जोशी दुबईला करणार 'जल्लोष'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2018 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...