मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Mumbai : मुलांच्या शिक्षणासाठी 2 दिवसांचा संगीत महोत्सव, दिग्गज कलाकार होणार सहभागी, Video

Mumbai : मुलांच्या शिक्षणासाठी 2 दिवसांचा संगीत महोत्सव, दिग्गज कलाकार होणार सहभागी, Video

X
ग्रामीण

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 11 जानेवारी : ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईत दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. चेन्नईच्या 'एम फॉर सेवा' या संस्थेच्या माध्यमातून 14 आणि 15 जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया इथं हा कार्यक्रम होणार आहे. या ज्ञान गंगा संगीत महोत्सवात शंकर महादेवन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, पूजा गायतोंडे, अंतरा नंदी, मेहताब अली नियाझी हे कलाकार सहभागी होणार आहेत.

    काय आहे कार्यक्रम?

    ज्ञानगंगा संगीत महोत्सवाच्या अंतर्गत रायझिंग इंडिया,  स्पुअरीचल इंडिया आणि हार्ट बीट ऑफ इंडिया या तीन कार्यक्रमातून वेगवेगळे कलाकार सादरीकरण करणार आहेत. 'आम्हाला या कार्यक्रमात स्वरांच्या मार्फत समाजसेवा करता येणार आहे, अशी भावना गायक प्रथमेश लघाटेनं व्यक्त केली.

    गाण्यातून समाज सेवा करायला मिळणे यासारखं दुसरं भाग्य नाही. गाण्याच्या मार्फत जेवढ्या वेगवेगळ्या समाज सेवा करता येतील त्या आम्ही कलाकार नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो. ही विद्या दानाची सेवा आहे. या कार्यक्रमामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. याचा खूप आनंद होत आहे, असं प्रथमेशची सहकारी गायिका मुग्धा वैशंपायननं सांगितलं.

    Video : ऐतिहासिक दागिन्यांना सोन्याची झळाळी, प्राजक्ता माळीनं सुरू केला नवा ब्रँड

    गुणीजन रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन, (ग्रेस) फाउंडेशन ही विना-नफा तत्त्वावर चालणारी संघटना असून आपल्या देशातील विविध भागांमधील भारतीय सादरीकरण कलाशी निगडीत सर्व घटकांना एकाच मंचावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. ग्रेस फाऊंडेशन हे मुंबईच्या संगीत क्षेत्राशी निगडित पंचम निषाद या सादरीकरण कंपनीचे संस्थापक शशी व्यास यांचे ब्रेनचाईल्ड आहे.

    या फाउंडेशनचे उद्दिष्ट हे शास्त्रीय संगीत वादक, नृत्य कलाकार, लोक आणि सुगम संगीत कलाकार इत्यादी भारतीय सादरीकरण कला क्षेत्राशी संबंधित निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिभावंतांच्या अस्सल क्षमतांना वाव देण्याचे आहे. या कलांनी भारत आणि जगातील लक्षावधी संगीत प्रेमींची आयुष्ये समृद्ध केली आहेत. अशी माहिती शशी व्यास यांनी दिली.

    First published:

    Tags: Entertainment, Local18, Mumbai