मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'कृष्णदासी'फेम अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, धर्मांतरणासाठी पती मारहाण करत असल्याचा आरोप

'कृष्णदासी'फेम अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, धर्मांतरणासाठी पती मारहाण करत असल्याचा आरोप

कौटुंबिक हिंसाचार हे समाजातील एक नकोसं वास्तव आहे. आता ग्लॅमरवर्ल्डमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.

कौटुंबिक हिंसाचार हे समाजातील एक नकोसं वास्तव आहे. आता ग्लॅमरवर्ल्डमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.

कौटुंबिक हिंसाचार हे समाजातील एक नकोसं वास्तव आहे. आता ग्लॅमरवर्ल्डमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे.

मुंबई, 9 जानेवारी : टीवी अभिनेत्री प्रिटी तलरेजाने (Preity Talreja) नवरा अभिजित पेटकर (Abhijit Petkar) विरोधात पोलिसात तक्रार (police complaint) दाखल केली आहे. प्रिटीने पतीवर मारहाण आणि सोबतच धर्मांतरणासाठी बळजबरी, शारीरिक आणि मानसिक शोषणाचा आरोपही केला आहे. प्रीटीने सोशल मीडियावर (social media) तिच्यावर झालेली कौटुंबिक हिंसा आणि मारहाणीचाही उल्लेख केला आहे. प्रिटीचा असा आरोप आहे, की तिने याआधीही पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी उदासीन धोरण स्वीकारत कुठलीच कारवाई केली नाही. यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पीएमओंना (PMO) टॅग करत झालेल्या अत्याचाराबाबतचा तपशील मांडला.

प्रिटीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता खडकपाडा पोलीस स्थानकात केस दाखल केली आहे. प्रिटी तलरेजाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.  यात चेहऱ्यावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसतात. इतकंच नाही, तिने याबाबत अनेक गोष्टीही तपशीलवार लिहिल्या आहेत. प्रिटी तलरेजाच्या पतीविरुद्ध खडकपाडा कल्याण पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत सुनैना होले यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

प्रिटीने अभिजित पेटकर या जिम चालकासोबत 3 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. आपल्या पोस्ट्समध्ये प्रिटीने सांगितलं आहे की, अभिजित मुस्लिम असून त्या दोघांनी निकाह केला आहे. मुस्लिम लॉअंतर्गत त्यांना मस्जिदकडून सर्टिफिकेट मिळालं नाही. आता अभिजित धर्म बदलण्यावरून प्रिटी यांना सतत मारहाण आणि जबरदस्ती करत असतो.

या अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, की पती लीगल डॉक्युमेंट्समध्येही त्याचं नाव अभिजित पेटकर असंच लिहितो. तो प्रेमाच्या नावाखाली तिला कायमच फसवतो आहे.

First published:

Tags: Police complaint, Social media, Violance