‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे अभिनेत्री पूजा गौर घराघरात पोहोचली होती. अभिनेत्री पूजा गौर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. पूजा नेहमीच आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफबद्दल चर्चेत असते. पूजा अभिनेता राज सिंग अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांच्या जोडीला खूपच पसंत केलं जात होतं. पूजा आणि राज तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2020 मध्ये या दोघांनी आपलं ब्रेकअप केलं होतं. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र दोघांनीही विभक्त होतं मैत्री, आदर आणि प्रेम कायम राहिलं असं सांगितल होतं. पूजाने ‘कितनी मोहब्बत है’ मालिकेतून पदार्पण केलं होतं. यामध्ये ती सहाय्यक भूमिकेत होती. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे पूजाने सावधान इंडियासारखा शोदेखील होस्ट केलं आहे तसेच ‘केदारनाथ’ या चित्रपटात सारा अली खानच्या बहिणीची भूमिकाही साकारली होती.