हैद्राबाद, 31 मे : 15 दिवसात चार बंगाली अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या वृत्तानंतर तेलगू मनोरंजन विश्वातूनही धक्कादायक (Shocking News) बातमी समोर आली आहे. तेलगू टेलिव्हीजन अभिनेत्री मैथिली हिने आत्महत्येचा प्रयत्न (TV actress attempts suicide) केल्याचं उघडकीस आलं आहे. तब्बल 8 ब्रिझर आणि झोपेच्या गोळ्या घेऊन तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत कळताच पोलीस तिच्या घरी दाखल झाले होते. स्वत:च्या घरात ती बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली होती. यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात हलवलं. सहा महिन्यांपूर्वी मैथिलीने पतीविरोधात अत्याचार, छळाचा गुन्हा दाखल केला आहे. 31 मे रोजी पंजागुट्टा पोलिसांना मैथिली आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तिचा मोबाइल ट्रक करीत पोलीस तिच्या घरापर्यंत पोहोचले. घरी पाहिलं तर मैथिली बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडली होती. पोलिसांनी तातडीने तिला रुग्णालयात हलवलं. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 27 सप्टेंबर, 2021 रोजी मैथिनीली पती श्रीधर रेड्डी विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणातील प्राथमिक तपास झाल्यानंतर केस कोर्टात दाखल झाली आहे. पतीशिवाय तिने त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.