मुंबई, 24 मार्च : अंकिता लोखंडे (Ankita Lokhande casting couch experience) हे नाव आता इंडस्ट्रीसाठी नवं नाही. छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून सुशांत सिंह राजपूत आणि अंकिताची 'अर्चना' घराघरात पोहोचली. पण पहिला मोठा ब्रेक मिळण्याआधी अंकिताला बरेच अनुभव आले होते. एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गलिच्छ व्यवहार केल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. कास्टिंग काऊच चा अनुभव तिने सांगितला.
“मी फार लहान होते तेव्हा एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या ऑडिशन साठी मला बोलावण्यात आलं होतं. तिथे एका माणसाने मला खोलीत बोलावलं व आपल्याला काही विचारायचं असल्याचं तो म्हणाला. ‘तुला कॉम्प्रमाइज कराव लागेल, तयारी आहे ना’", असं विचारण्यात आलं. असं अंकिता म्हणाली.
पुढे अंकिताने आणखी खुलासा करत सांगितलं की, “मी त्यावेळी साधारणत: 19-20 वर्षांची होते. त्याने मला ज्या खोलीत बोलावलं तिथे कोणीही नव्हतं. तेव्हा मीही मुद्दाम विचारलं सांगा कोणतं कॉम्प्रमाइज करावं लागेल? मला डिनर पार्टीला जावं लागेल? प्रोडुसर्स ना काय वाटतं?”
त्यानंतर मी लहान होते तरी त्यांची चांगलीच शाळा घेतल्याचंही अंकिता म्हणाली. “तुम्हाला चांगली हुशार अभिनेत्री नको तर झोपण्यासाठी मुलगी पाहिजे?" असा सवाल आपण केला. "त्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली आणि आम्ही तुला काम द्यायला तयार आहोत असं सांगण्यात आलं. पण मी त्यांना साफ नकार दिला,” अंकिता म्हणाली.
फिल्म इंडस्ट्री मधील एका नावाजलेल्या अभिनेत्याने गैरवर्तन केल्याचा गौप्यस्फोटही अंकिताने या मुलाखतीत केला. पण आपल्याला कोणाचंही नाव घ्यायचं नसल्याचं तिने म्हटलं.
अनेक अभिनेत्रींनी आजवर कास्टिंग काउच वर भाष्य केलं आहे. कास्टिंग काऊच हा विषय इंडस्ट्रीसाठी नवा नाही. MeToo मोहिमेअंतर्गतही यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न झाला. तर आता इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री अंकिताने ही तिचा कास्टिंग काउच बद्दलचा अनुभव मांडला आहे.
अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त मणिकर्णिका, बागी 3 या चित्रपटांमधे भूमिका साकारल्या आहेत. मणिकर्णिका चित्रपटात ऐतिहासिक पात्र अंकिताने साकारलं होतं. झलकरीबाईची भूमिका तिने साकारली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ankita lokhande, Casting couch, Entertainment, MeToo, Tv actress