जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video : वहिनीसाहेबांच्या वर्कआऊटची चाहत्यांना काळजी, म्हणतायतं, आहो जरा सांभाळून...

Video : वहिनीसाहेबांच्या वर्कआऊटची चाहत्यांना काळजी, म्हणतायतं, आहो जरा सांभाळून...

Video : वहिनीसाहेबांच्या वर्कआऊटची चाहत्यांना काळजी, म्हणतायतं, आहो जरा सांभाळून...

वहिनीसाहेब फेम धनश्री काडकावकर तिच्या ( dhanashri kadgaonkar transformation ) ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या तिच्या हार्ड वर्कआऊटची सोशल मीडियावर चर्चा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 मार्च-  अभिनेत्री धनश्री काडगावकर ( dhanashri kadgaonkar ) तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. धनश्री काडगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. मागच्या काही दिवसापासून धनश्री काडगावर तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते आहे. सोशल मीडियावर ती काही वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर देखील करत असते. नुकताच तिनं एक वर्कआऊटचा व्हिडिओ सोशल मीडिआवर शेअर केला आहे. तिचं हे हार्ड वर्कआऊट पाहून एका चाहत्याने तिला सांभाळून करण्याचा सल्ला दिला आहे. धनश्री काडकावकरनं हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की..बर्न इट बेबी..तिच्या या व्हिडिओवर कुणी या बेबी..रॉक इट..खूप छान अशा काहीशा कमेंट करत तिचा उत्साह देण्याचा प्रयत्न केला आहे. तर एकानं म्हटलं आहे की, आहो जरा सांभाळून. वाचा- ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेत अभिनेते संजय मोने यांची होणार एंट्री प्रेग्नंसी दरम्यान धनश्री काडगावकरचं वजन 25 किलो वजन वाढलं असल्याचे तिनं नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. यामुळे तिला कशाप्रकारे ट्रोलिंगचा ( dhanashri kadgaonkar troll ) सामाना करावा लागला याचा धक्कादायक अनुभव तिनं सांगितला होता.

जाहिरात

सध्या ती तिच्या ( dhanashri kadgaonkar transformation ) ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सध्या ती वर्कआऊट करताना दिसते. त्याचेच व्हिडिओ ती शेअर करत असते. तिनं  वजन कमी केल्याचे दिसते. यासाठी तिनं घेतलेली मेहनत देखील दिसते. आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस  दिसू लागली आहे. दररोज ती वर्कआऊट, योगा, डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय. तिच्या फोटोशूटमुळे ती नेहमीच लक्षवेधून घेत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात