News18 Lokmat

Trailer: 'आप तो देश के प्रधानमंत्री है, आपकी माँ के साथ ऐसा होता तो कैसा लगता?'

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील गरिबी आणि आपली राजकीय व्यवस्था यावर टोकदार भाष्य करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 06:52 PM IST

Trailer: 'आप तो देश के प्रधानमंत्री है, आपकी माँ के साथ ऐसा होता तो कैसा लगता?'

मुंबई, 10 फेब्रुवारी : 'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. कारण यामध्ये मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील गरिबी आणि आपली राजकीय व्यवस्था यावर टोकदार भाष्य करण्यात आलं आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अंजली पाटील यांची मुख्य भूमिका आहे. शहरातील दारिद्र आणि त्यातून तयार झालेल्या समस्या यावर प्रामुख्याने हा सिनेमा आधारेलेला आहे.

मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा कान्हू हा 8 वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत झालेल्या एका प्रसंगाबाबत पंतप्रधानांना पत्र लिहित असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. हा सिनेमा 15 मार्च 2019 ला प्रदर्शित होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 06:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...