मुंबई, 14 डिसेंबर : 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूपचं त्रासदायक ठरलं आहे. या काळात मनोरंजनाच्या दृष्टीने मोजक्याचं गोष्टी आपल्या हातात होत्या, ज्यामुळं आपल्या चेहऱ्यावर हसू आलं. देशभरातील सर्व चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे अनेक चित्रपटप्रेमींनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला. त्यांनी ओटीटीवर वेब सीरिज पाहणं अधिक पसंद केलं आहे. सध्या नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असंख्य वेब सीरिज उपलब्ध आहेत. परंतु कोणता चित्रपट किंवा वेब सीरिज पाहण्यासाठी निवडावी हा प्रश्न दर्शकांना सतावतो. त्यामुळं आयएमडीबीनं एक यादी जाहीर केली आहे. आयएमडीबीने निवडलेल्या वेब मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद आणि खूप प्रेम दिलं आहे. आजही लोकं ही मालिका पून्हा पून्हा पाहतात. यातील काही वेब सीरिज कॉमेडी आहेत, तर काही थ्रिलर आहेत, तर काहींमध्ये मोठा संदेश दडलाय. त्यामुळं इथं 2020 सालच्या अव्वल क्रमांकाच्या 10 वेब मालिकांची सूची देण्यात आली आहे. स्कॅम 1992
स्कॅम 1992 ही हर्षद मेहताची कथा असून दर्शकांनी याला खूपचं पसंदी दिली आहे. या वेब मालिकेनं आयएमडीबीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. ही वेब मालिका तुम्ही SonyLiv या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. पंचायत
दुसऱ्या क्रमांकावर पंचायत ही वेब मालिका आहे. ही मालिका तुम्हाला गावातलं दर्शन घडवतं. या वेब मालिकेची कथा खूपच तगडी असून तुम्हाला खिळवून ठेवायला मदत करते. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. स्पेशल ओपीएस
स्पेशल ओपीएस जेव्हा रिलीज झाली, तेव्हा जिकडं तिकडं याच वेब सीरीजचा बोलबाला होता. ही सिरीज 2002 साली संसदेवर झालेल्या हल्यासंदर्भात असून याच्या कथेला अनेक राजकीय संदर्भ चिकटलेले आहेत. संसदेवर झालेल्या हल्ल्यातील प्रमुख दहशतवाद्याला पकडण्यासाठी भारतीय गुप्त एजंटने केलेल्या साहसी मिशनचं दर्शन तुम्हाला या वेब सीरीज मध्ये पाहायला मिळेल. ही वेब मालिका हॉटस्टारवर पाहायला मिळेल. बंदिश बँडीट्स
या वेब मालिकेनं आयएमडीबीच्या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. ही मालिकेला दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बंदिश बँडीट्सची कथा दोन गायकांची असून दर्शकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात या मालिकेला यश आलं आहे. ही मालिका प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. मिर्जापूर - 2
मिर्जापूर वेब सीरीजचे फॅन्स गेल्या एक वर्षभरापासून या सीरीजची वाट पाहत होते. यातील प्रत्येक डायलॉग उच्च कोटीचा आणि दर्शकांच्या जीभेवर रेंगाळणारे आहेत. याची कथा थ्रिलर असून शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला आहे. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. असुर
असुर ही वेब मालिका सत्य घटनेवर अधारीत असून क्राइम आणि थ्रिलरने ओतप्रेत भरलेली आहे. अर्शद वारसीने यामध्ये अप्रतिम अभिनय केला आहे. ही वेब सीरीज तुम्हाला वूट (Voot) वर पाहता येईल. पाताळ लोक
पाताळ लोक ही कथा एका घटनेच्या पोलीस तपाससंदर्भातला आहे. सुरूवातीला साधी केस असेल अशी वाटणारी कथा क्राइमच्या दुनियेतील अनेक धागेदोरे उलगडते. ही वेब मालिका तुम्ही प्राइम व्हिडियो या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हाई
ही वेब मालिका तुम्हाला नशेच्या दुनियेची सैर करवून आणते. नशेच्या बाजारात होणाऱ्या घडामोडी, खून, राजकारण, जीवघेणी स्पर्धा असं एकंदरीत सर्व घटकांना स्पर्श करणारी ही मालिका आहे. तुम्ही ही वेब मालिका एमएक्स व्हिडिओवर पाहू शकता. आर्या
सुष्मिता सेन यांनी या मालिकेत दमदार अभिनय साकारला असून त्यांची ही पहिलीच वेब मालिका आहे. ही मालिकेची पटकथा पेनोझा या डच नाटकावर अधारित आहे. ही वेब सीरीज तुम्हाला हॉटस्टारवर पाहता येईल. अभय
अभय ही वेब मालिका क्राइम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण आहे. ही कथा एका क्राइम कादंबरीवर अधारित आहे. ही मालिका ZEE5 वर पाहू शकता.