बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्री ज्यांनी नाकारले शाहरुख-सलमान-आमिरचे सिनेमे

बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचं सलमान, शाहरुख आणि आमिर यांच्यासोबत एका तरी सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतं.

  • Share this:

बॉलिवूडमधील तिनही खान बिग बजेट सिनेमांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेत्रीचं त्यांच्यासोबत एक तरी सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतं. पण बॉलिवूड अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी या तिनही खानच्या बिग बजेट सिनेमांना नकार दिला आहे. जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री...

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने आमिर खानच्या 'राजा हिंदुस्तानी' सिनेमाला नकार दिला होता. त्यावेळी ती मिस वर्ल्ड स्पर्धेची तयारी करत होती. त्यानंतर या सिनेमात करिश्मा कपूरची वर्णी लागली.

दीपिका आणि सलमानला एकत्र पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची खूप इच्छा आहे मात्र दीपिकानं आतापर्यंत सलमानच्या एक दोन नाही तर तब्बल चार सिनेमांना नकार दिला आहे. यात 'किक', 'जय हो', 'बजरंगी भाईजान' आणि 'सुलतान' या सिनेमांचा समावेश आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या मते तिला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही खानची गरज नाही. तिचे स्त्रीप्रधान भूमिका असलेले सिनेमे सुद्धा खूप गाजले आहे. दीपिकानंतर कंगनाला सुलतान सिनेमासाठी विचारणा झाली होती मात्र तिने या सिनेमाला नकार दिला होता. हा सिनेमा तिच्या करिअरमध्ये काही करू शकत नाही असं तिचं म्हणणं होतं.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ग्लोबल बनली आहे बॉलिवूड प्रमाणेच तिनं हॉलिवूडमध्येही तिचं नाणं खाणखणीत वाजवलं. प्रियांकानं आमिरचा 'गजनी' हा सिनेमा नाकारला होता. तसेच काही काळापूर्वी तिनं सलमानचा 'भारत' सिनेमाही नाकारला होता. ज्यावर सलमाननं तिला अनेकदा टार्गेट केलं होतं.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं 'बादशाह' हा सिनेमा नाकारला. या सिनेमात शाहरुख खान सोबत नंतर ट्विंकल खन्नाला कास्ट करण्यात आलं आणि हा सिनेमा ब्लॉकबास्टर ठरला. यातील ट्विंकलच्या अभिनयचंही खूप कौतुक झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या