कोलकाता, 06 ऑक्टोबर: TMCच्या खासदार नुसरत जहां यांची लग्नानंतर पहिल्या दुर्गा पूजेचे फोटो आणि नवरात्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नानंतर पहिला सण आणि दूर्गा पूजा केली. पती निखिल जैन यांच्यासोबत पूजा करताना आणि गरबा खेळतानाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडला आहे. नुसरत यांचे फॅन इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट त्यांना जाणून घेण्यात रस असतो. नुसरत यांनी सोशल मीडियावर अपलोड केलेले फोटो वाऱ्यासारखे तुफान व्हायरल होतात. लग्नानंतर त्यांनी दूर्गा पूजेचा आणि पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. पतीसोबतचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. नेटकऱ्यांनी या फोटोला तुफान लाईक्स दिलेत. नवरात्रीच्या शुभेच्छा देताना नुसरत यांनी हे फोटो शेअर केले.
Kolkata: Trinamool Congress MP Nusrat Jahan and husband Nikhil Jain offer prayers at Suruchi Sangha Pandal. #DurgaPuja2019 pic.twitter.com/WF1Dw66Ein
— ANI (@ANI) October 6, 2019
नुसरत यांचे काही फोटो ट्विटरवर ट्रेन्ड होत आहेत. या फोटोमध्ये नुसरत आणि त्यांचे पती दोघंही देवीसमोर हात जोडून प्रार्थना करत आहेत.अभिनेत्री नुसरत या आता संसदेत खासदार आहेत. टीएमसीची सर्वात सुंदर खासदार यांनी तुर्कीत डेस्टिनेशन वेडिंग केलं.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या नुसरत यांनी १७ व्या लोकसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झाल्या. लाल पिवळ्या रंगाच्या या साडीत नुसरत यांचा लूक आणखीनच सुंदर वाटत आहे. त्यांचे दागिने आणि साडी दोन्हीत खुलून दिसत आहेत. त्यांच्या इन्टाग्राम अकांऊटवर त्यांनी शुभेच्छा देताना काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या नाचत आहेत आणि लग्नानंतर आलेल्या पहिल्या सणाचा मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.