मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Tiger Shroff च्या डोळ्याला जबर दुखापत; PHOTO पाहून चाहते चिंतेत

Tiger Shroff च्या डोळ्याला जबर दुखापत; PHOTO पाहून चाहते चिंतेत

बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता टायगर श्रॉफ  (Tiger Shroff)  सध्या आपल्या 'गणपत पार्ट 1' (Ganapath Part 1)  च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.मात्र शूटिंग दरम्यान टायगरला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या आपल्या 'गणपत पार्ट 1' (Ganapath Part 1) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.मात्र शूटिंग दरम्यान टायगरला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या आपल्या 'गणपत पार्ट 1' (Ganapath Part 1) च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.मात्र शूटिंग दरम्यान टायगरला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

  मुंबई,22 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता टायगर श्रॉफ    (Tiger Shroff)   सध्या आपल्या 'गणपत पार्ट 1'  (Ganapath Part 1)   च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र शूटिंग दरम्यान टायगरला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. ही माहिती समजताच अभिनेत्याचे चाहते चिंता करू लागले आहेत. टायगर श्रॉफचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याला दुखापत झालेलं दिसत आहे. अभिनेता टायगर श्रॉफनं नुकताच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपला एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये टायगरच्या डाव्या डोळ्याला दुखापत झालेलं दिसून येत आहे. अभिनेत्याचा डोळा सुजला तर आहेच. शिवाय टायगरचा डोळा काळा पडला आहे. हा फोटो समोर येताच चाहते चिंतीत झाले आहेत. टायगर श्रॉफनं हा फोटो शेअर करत लिहिलं आहे Shit Happens # Ganapath Final #Countdown. टायगर श्रॉफचा हा फोटो पाहून चाहते त्याच्या तब्बेतीची काळजी करत आहेत. तसेच तो लवकर बरा होईल अशी प्रार्थना करत आहेत. टायगर श्रॉफ हा एक फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. त्याच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. अभिनेता सतत विविध एक्सरसाईज करताना दिसून येतो. फिटनेस प्रति त्याचं प्रेम पाहून सर्च थक्क होतात. टायगर तासंतास जिममध्ये घाम गाळताना दिसून येतो. इतकंच नव्हे तर तो बऱ्याचवेळा आऊट डोअर एक्सरसाईज करताना ही दिसून येतो. कित्येक तरुण टायगर श्रॉफचा फिटनेस फंडा फॉलो करत असतात. शिवाय त्याच्या सारखी बॉडी बनवण्याचं स्वप्न पाहात असतात. मात्र हे तितकसं सोपं नाही हे नक्की, कारण अनेक टीव्ही शोमध्ये असं ऐकायला आणि पाहायला मिळालं आहे, कि फिटनेससाठी टायगरनं गोड खाणं कित्येक वर्ष झालं बंद केलं आहे. आपल्या आवडत्या गोष्टी खाण्याचं टाळणं हे खरंच एक मोठं चॅलेंज आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. नुकताच टायगर श्रॉफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ फारच चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये टायगर शर्टलेस रनिंग करताना दिसून आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे टायगर मायनस वन डिग्रीमध्ये ही एक्सरसाईज करत होता. त्यामुळे सर्वांनाच टायगरच कौतुक वाटलं होतं. तर अनेकांना टायगरच्या या धाडसाचं आश्चर्य वाटत होत. तसेच टायगरने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं होतं, 'थोडी नेचर cryotherapy माझ्या दिवसाच्या सुरुवातीसाठी' या व्हिडीओवर अनेक कलाकार मित्रांनी कमेंट्स करून आश्चर्य व्यक्त केला होता. तसेच टायगरची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने LOL अशी कमेंट केली होती. (हे वाचा:Exclusive: नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट Leak, वाचा नेमकं काय झालं बोलणं) टायगर सध्या आपल्या आगामी 'गणपत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र शूटिंगमधून वेळ काढत तो आपल्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देत आहे. टायगर श्रॉफ बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेला नाहीय. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या त्याच्या 'गणपत' या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. त्यामुळे तो लवकरच चाहत्यांना सरप्राईज देणार आहे. या चित्रपटात टायगरसोबतच बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अभिनेत्री क्रिती सेननही मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटातील क्रितीच्या हटके लूकची बरीच चर्चादेखील झाली होती. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहेत. तसेच क्रिती आणि टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटातून एकत्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Tiger Shroff

  पुढील बातम्या