• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • हणम्याची होणार एक्झिट?; 'ती परत आलीये' मालिकेत मोठा ट्विस्ट

हणम्याची होणार एक्झिट?; 'ती परत आलीये' मालिकेत मोठा ट्विस्ट

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे

 • Share this:
  मुंबई, 9 नोव्हेंबर- झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye)  ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यातीलच एक लक्षवेधी भूमिका म्हणजे हणम्या होय. अभिनेता समीर खांडेकर  (Sameer Khandekar)  हि व्यक्तिरेखा अगदी चोख बजावतोय. पण आता मालिकेत हणम्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, कि या मित्रांचे पालक त्यांना शोधत रिसॉर्टजवळच्या जंगलात येतात आणि मास्कधारी व्यक्तीच्या कचाट्यात सापडतात. मित्रांना कळतं की त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले आहेत. पण त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. मास्कधारी व्यक्ती मित्रांच्या नातेवाईकांना पकडून एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवते. मित्र आपल्या नातेवाईकांना शोधण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते त्यांना सापडत नाहीत. हनम्याला टीव्ही रुममध्ये त्याच्या वडिलांना बांधून ठेवलेलं दिसतं आणि तो त्यांना शोधत जंगलात पळतो आणि त्यामध्ये हणम्या मास्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडतो. मस्कधारी व्यक्तीच्या तावडीत सापडल्यामुळे हणम्याच्या जीवाला धोका निर्माण होणार यात शंका नाही. आता मस्कधारी व्यक्ती हणम्याचा जीव घेईल कि हणम्या त्या मस्कधारी व्यक्तीच्या पर्दाफाश करेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. हा मास्कदहरी व्यक्ती त्यांच्या ग्रुपमधीलच एक आहे, कि कोणी निराळाच आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक झाले आहेत. दिवसेंदिवस घडत असलेल्या थरारक घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही महिन्यांपूर्वी झी टीव्हीवर 'ती परत आलीये' ही रहस्यमयी मालिका आपल्या भेटीला आली आहे. मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरली आहे. मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. त्यामुळे सर्व लोक मालिकेत गुंतून जातात. मालिकेतील बाहुलीने तर सर्वांचा थरकाप उडवला आहे. अनेकांनी ती बाहुली दाखवू नये अशीही मागणी केली होती. बाहुलीच्या डोळ्यांनी ती जिवंत बाहुली असल्याची अनुभूती येते. असं म्हणत मोठ्या प्रमाणात विरोधसुद्धा केला होता. मात्र आता हाच मुखवटा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या मुखवट्यामागे कोणता चेहरा असणार हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: