मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चित्रपटात फ्लॉप पण गरोदरपणामुळं हिट; लिसा हेडनला फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन

चित्रपटात फ्लॉप पण गरोदरपणामुळं हिट; लिसा हेडनला फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन

बॉलिवूड आणि मॉडलिंगमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री लिसा हेडन गरोदरपणामुळं झाली प्रसिद्ध; एका फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन

बॉलिवूड आणि मॉडलिंगमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री लिसा हेडन गरोदरपणामुळं झाली प्रसिद्ध; एका फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन

बॉलिवूड आणि मॉडलिंगमध्ये फ्लॉप झालेली अभिनेत्री लिसा हेडन गरोदरपणामुळं झाली प्रसिद्ध; एका फोटोशूटसाठी मिळतंय कोट्यवधींचं मानधन

मुंबई 17 जून: लिसा हेडन (Lisa Haydon) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हाऊसफुल 3, क्वीन, ऐ दिल है मुक्शील यांसारख्या काही सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या लिसानं आपल्या मादक अदांच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. आज लिसाचा वाढदिवस आहे. (Lisa Haydon birthday) 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे लिसा चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळं अधिक चर्चेत असते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अभिनयापेक्षा अधिक प्रसिद्धी तिला तिच्या गरोदरपणामुळं मिळाली.

HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

चेन्नईत जन्मलेल्या लिसाने तिचं बहुतेक आयुष्य भारताबाहेरच काढलं आहे. मुंबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे ती वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली. ‘हाऊसफुल्ल ३’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’ अशा काही चित्रपटांमध्ये लिसाने काम केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिचे बहुतांशी चित्रपट सुपरहिट ठरले. तिकिटबारीवर चांगलं यश देखील मिळालं. परंतु याचं श्रेय मात्र कधीच लिसाला मिळालं नाही. त्यामुळं तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. या प्रकाराला वैतागून अखेर लिसानं बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र आपल्या गरोदरपणामुळं प्रकाशझोतात आहे.

OTT Queens: चित्रपट नव्हे तर या अभिनेत्रींनी वेब सिरीज मधून बनवली ओळख

लिसा हेडन सध्या तिसऱ्यांदा गरोदर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपट आणि मॉडलिंगमुळं तिला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी तिला गरोदरपणानं दिली. तिचे फोटोज जगभरातील नामांकित मॅगझिनवर झलकताना दिसतात. तिच्या व्हिडीओंवर लाखो चाहते प्रतिक्रिया देतात. काही जण तिला ट्रोल देखील करतात. पण यामुळं देखील ती सोशल मीडियावर असते.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Success story