जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रतीक्षा संपली! आता घरबसल्या पाहता येणार The Kerala Story; कसं आणि कुठे? तुम्हीच पाहा

प्रतीक्षा संपली! आता घरबसल्या पाहता येणार The Kerala Story; कसं आणि कुठे? तुम्हीच पाहा

 'द केरळ स्टोरी' ओटीटी रिलीज

'द केरळ स्टोरी' ओटीटी रिलीज

The Kerala Story OTT Release: विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती असलेला व अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला आणि सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय.

  • -MIN READ Trending Desk Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 1 जून- विपुल अमृतलाल शाह यांची निर्मिती असलेला व अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला आणि सुदीप्तो सेन यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. नुकताच या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांच्या कमाईचा पल्ला पार केला. त्यामुळे आता चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर कधी प्रदर्शित होईल, याची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार असून, लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. लव्ह जिहादला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. त्यातच आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला, आणि तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटानं कोट्यावधीची कमाई केली. ओटीटीवरसुद्धा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळून तेथेही तो चांगली कमाई करण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. (हे वाचा: Shabana Azmi: पहिल्यांदाच सवतीबाबत बोलल्या शबाना आझमी; कोण आहे जावेद अख्तर यांची पहिली पत्नी आणि फरहानची आई? ) वादग्रस्त ठरला होता चित्रपट- ‘द केरला स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. बंगालपासून तमिळनाडूपर्यंत काही मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाला बंदीचा सामना करावा लागला. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामध्ये फातिमा बी म्हणजेच शालिनी उन्नीकृष्णन आणि इतर तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे. या तिन्ही मुलींचं कसं ब्रेनवॉश करून त्यांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आलं, हे या चित्रपटात दाखवलं गेलं आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्यातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यानं त्याची उत्सुकता चाहत्यांना लागलीय. कधी व कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट- मीडिया रिपोर्ट्सनुसार, झी 5 ला ‘दे केरला स्टोरी’चे डिजिटल अधिकार मिळाले आहेत. लवकरच हा ब्लॉकबस्टर चित्रपट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप उघड झालेली नाही. तसेच निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहितीही शेअर केलेली नाही. पण जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होईल, तेव्हा तो सिनेमागृहाप्रमाणे ओटीटीवर धुमाकूळ घालू शकतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दरम्यान, अद्यापही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौळ सुरुच आहे. यावरून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ अद्यापही कायम असल्याचं दिसतं आहे. काही राज्यांनी या चित्रपटाला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती. पण अशा राज्यातील नागरिकांनासुद्धा ओटीटीवर हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर तो घरी बसून पाहता येऊ शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात