मुंबई, 3 जून- सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ तीन आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रिलीजपूर्वीच वादात सापडलेला हा चित्रपट आजही वादात सापडला आहे. याआधी नवाजुद्दीन सिद्दीकी, अनुराग कश्यप, नसिरुद्दीन शाह आणि कमल हसन यांनी या चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं होतं. आता सिने एडिटर बिना पॉल यांनी या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हा चित्रपट तथ्यहीन आणि बनावट असल्याचं म्हटलं आहे. ‘द केरळ स्टोरी’ 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा अपप्रचार सांगितला तर काहींनी हा देशात पाडणारा चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटावरुन सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट खूप पुढे गेला आहे. केरळ स्टोरीवर काही राज्यांमध्ये बंदीदेखील घालण्यात आली होती.आता सिने एडिटर बीना पॉल यांनी या चित्रपटाबाबत विधान केलं आहे. तसेच केरळच्या लोकांनी हा चित्रपट पाहिला नाही याचा मला अभिमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. Guess Who!चॅलेंज, या फोटोतील मुलीला ओळखून दाखवाच; कोट्यवधी तरुणांच्या हृदयावर करते राज्य बीना पॉल वक्तव्य- ‘द केरळ स्टोरी’वर आपलं मत मांडताना बीना पॉलयांनी म्हटलं, ‘या चित्रपटाने इतकी लोकप्रियता कशी मिळवली याचा विचार करुन मला आश्चर्य वाटतं. त्यातून भरपूर पैसाही कमावला आहे. यावर कोणी बोललं नसतं तर हा चित्रपट कधीच चालला नसता. त्या म्हणाल्या की, आज अशी वेळ आली आहे की तुम्ही कितीही खोटे पसरवले तरी फरक पडत नाही.अशा वातावरणात कोणीही प्रचारात्मक चित्रपट बनवून वाहवा मिळवू शकतो. असं करणाऱ्यांना पूर्ण सुरक्षा मिळत आहे. चुकीची वस्तुस्थिती मांडल्यानंतर दिग्दर्शकाला ट्रेलरही बदलावा लागला पण कोणीही त्याची पर्वा केली नाही’.
सिनेमॅटिक मूल्ये नाही- याबाबत बोलताना बीना पॉल यांनी पुढं म्हटलं की, चुकीची तथ्ये दाखवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई केली आहे. याचं मला खूप वाईट वाटत आहे. मी हा चित्रपट पाहिला नाही पण ऐकलं आहे की ते वस्तुस्थितीनुसार चुकीचं आहे. आणि चित्रपटाला कोणतेही सिनेमॅटिक मूल्य नाही." मात्र, बीना म्हणतात की, केरळच्या लोकांनी हा चित्रपट नाकारल्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो. बीना पॉल याच्याआधीही केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, नवाजुद्दीन सिद्दिकी, अनुराग कश्यप, कमल हसन आणि बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनीही ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर आपलं मत व्यक्त केलं आहे. बहुतेक लोकांनी याला प्रोपोगंडा फिल्म म्हटलं आहे.