मुंबई, 17 जानेवारी- बहुचर्चित आणि तितकाच वादग्रस्त ठरलेलय ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेती मराठमोळी अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. नुकतंच एक माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी जखमी झाली आहे. अभिनेत्रीला एका कारने धडक दिली असून. चित्रपटाच्या सेटवरच ही घटना घडली आहे. आयएएनएसने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या सेटवर एका कारचं नियंत्रण सुटलं आणि ती कार येऊन अभिनेत्री पल्लवी जोशीला धडकली.मात्र अभिनेत्रीने दुखापत असूनही, आपला शॉट पूर्ण केला आणि नंतर उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार पल्लवी जोशी ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे. **(हे वाचा:** Aishwarya Rai:ऐश्वर्या रायचा निष्काळजीपणा, सिन्नर तहसीलदारांने बजावली थेट नोटीस,नेमकं काय घडलं? ) पल्लवी जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. पल्लवी जोशीने एक दिवसापूर्वी द व्हॅक्सीन वॉरच्या सेटवरील तिचे दोन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती मनमोकळेपणाने हसताना दिसली होती. यामध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं, “द व्हॅक्सिन वॉरच्या सेटवरून.“चाहत्यांनी या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स दिले होते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्र आणि शास्त्रज्ञांच्या समर्थन आणि समर्पणाला ट्रिब्यूट देणारा आहे. हा सिनेमा भारतीय शास्त्रज्ञ आणि लोकांवर आधारित आहे ज्यांनी कोरोनाविरूद्ध लस विकसित करण्यासाठी 2 वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस काम केल. हा चित्रपट भारतीय शास्त्रज्ञांची बाजू सांगणारा आहे जे जागतिक उत्पादकांच्या दबावातून बचावत आपल्या देशवासियांचे प्राण वाचवण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत काम केलं.
दिगदर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यापूर्वी सांगितलं आहे की, ‘द व्हॅक्सिन वॉर’ या विषयावर संशोधन करण्यासाठी आणि योग्य तथ्य प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. या चित्रपटाची कथा 3200 पानांची असून या कथेवर 82 जणांनी रात्रंदिवस काम केलं आहे. संशोधनासाठी या चित्रपटाची टीम खऱ्या शास्त्रज्ञांना आणि लस विकसित करणाऱ्या लोकांना भेटली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.