मुंबई, 2 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो 'द कपिल शर्मा शो' अनेक वर्षांपासून लोकांच मनोरंजन करत आहे. या शोमधील अनेक जुन्या कलाकारांनी शोला रामराम ठोकला होता. त्यामुळे अनेक नव्या कलाकारांनी शोमध्ये स्थान मिळवल आहे. काही दिवसांच्या ब्रेकनंतर या शोने गेल्या वर्षी टीव्हीवर कमबॅक केलं होतं. सप्टेंबरमध्ये शोचा नवा सीजन सुरु करण्यात आला होता. या शोच्या प्रोमोमध्ये अभिनेता कॉमेडियन कृष्णा अभिषेक दिसला होता. परंतु शो सुरु झाल्यानंतर तो गायब दिसला. त्यांनतर फीमुळे त्याने शो सोडल्याचा रिपोर्ट समोर आला होता. दरम्यान आता आणखी एका कॉमेडियन कलाकाराने कपिलची साथ सोडल्याचं समोर आलं आहे.
या कॉमेडी शोमधून अनेक कलाकारांनी एक्झिट घेत नव्या प्रोजेक्ट्समध्ये वर्णी लावली होती. कपिल शर्माचा खास मित्र आणि कॉमेडियन चंदन प्रभाकरनेही शो मध्येच सोडला होता, कारण त्याने नवीन चित्रपट साइन केला होता. आता आणखी एका कलाकाराने या शोला अलविदा केल आहे. ई टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन सिद्धार्थ सागरने कपिल शर्मा शो सोडला आहे. सिद्धार्थ 'द कपिल शर्मा शो'मध्ये सेल्फी मौसी, उस्ताद घरचोरदास, फनवीर सिंग आणि सागर पगलेटू यांसारख्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच मनोरंजन करत होता. सिद्धार्थचा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडत होता.
(हे वाचा:गोविंदाच्या भाचीने गुपचूप उरकलं लग्न? Bigg Boss फेम राजीव अदातियासोबतचा वेडिंग फोटो VIRAL )
सिद्धार्थच्या शो सोडण्यामागील कारण मानधन असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थचा मानधनाबाबत शोच्या निर्मात्यांसोबत मतभेद सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थला त्याची फी वाढवायची होती, पण निर्माते त्याच मानधन वाढवायला तयार नव्हते. त्यामुळेच त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, 'द कपिल शर्मा शो'च्या शूटिंगसाठी मुंबईत शिफ्ट झालेला सिद्धार्थ आता पुन्हा दिल्लीतील त्याच्या घरी परतला आहे. त्यामुळे तो शोमध्ये पुन्हा येणार की नाही याबाबत शंका आहे.
View this post on Instagram
रिपोर्टनुसार, जेव्हा सिद्धार्थ सागरसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा कॉमेडियनने यावर काहीही बोलण्यास नकार दिला.सोबतच असं काही नसल्याचही त्याने सांगितल. सध्या तो याबाबत काहीही सांगू शकत नाही कारण तो निर्मात्यांशी बोलत आहे.
सिद्धार्थ हा शो सोडणारा एकमेव कलाकार नाही.तर त्याच्या आधी कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदन प्रभाकर, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंग यांनी कपिल शर्मा शोला रामराम ठोकला आहे. सध्या यातील अनेक कलाकार विविध शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.