प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री आणि गायकाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांचं पूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नथ असं होतं. परंतु ते केके म्हणूनच जगभर प्रसिद्ध होते.
यारों', 'तू आशिकी है' आणि 'लबों को' सारख्या अनेक सुपरडुपर हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केके यांचं वयाच्या 53 व्या वर्षी निधन झालं. कृष्ण कुमार कुन्नथ त्यांच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी तसेच त्यांच्या साध्य राहाणीमासाठी ओळखले जात होते.
केकेचा जन्म 23 ऑगस्ट 1968 मध्ये झाला होता. ते लहानाचे मोठे दिल्लीमध्ये झाले होते. त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 6 महिने सेल्समन म्हणून काम केलं आहे.
परंतु हे काम त्यांनी का केलं याचा खुलासा त्यांनी काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये केला होता.
अवघ्या 6 महिने त्यांनी ही नोकरी केली होती. त्यांनतर पत्नी आणि वडिलांच्या साहाय्याने आपल्या गायनाची आवड जोपासली.