Home /News /entertainment /

प्रसिद्ध मालिकेचा सेट Cyclone Tauktae मुळे उद्ध्वस्त; बचावासाठी क्रू मेंबर्सची पळापळ, पाहा VIDEO

प्रसिद्ध मालिकेचा सेट Cyclone Tauktae मुळे उद्ध्वस्त; बचावासाठी क्रू मेंबर्सची पळापळ, पाहा VIDEO

अरबी समुद्रातून (Arabian Sea) उठलेल्या चक्रीवादळाने अत्यंत अक्राळ विक्राळ रुप धारण केलं आहे.

  नवी दिल्ली, 17 मे : अरबी समुद्रातून (Arabian Sea) उठलेल्या चक्रीवादळाने अत्यंत अक्राळ विक्राळ रुप धारण केलं आहे. यामुळे प्रशासन आणि सुरक्षा दलाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. राज्यात तर या चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे. परिणामी मुंबईसह राज्यातील अनेक भागात याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गोवा आणि गुजरातमध्येही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. गुजरातच्या वापी शहरता सध्या अनेक टीव्ही मालिकांचं चित्रीकरण सुरू आहे. अशात तौत्के चक्रीवादळामुळे मालिकांच्या चित्रीकरणामध्ये खंड पडला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) याने आपल्या सोशल मीडियावर चक्रीवादळाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ या मालिकेच्या सेटवरील आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वादळामुळे सेट उद्ध्वस्त झाला आहे. व्हिडिओमध्ये क्रू मेंबर्स इकडे-तिकडे पळताना दिसत आहे.
  व्हिडिओमध्ये क्रू पळा..पळा असं म्हणताना दिसत आहेत. वादळामुळे सर्व क्रू मेंबर्स इकडे-तिकडे पळत सेटच्या सामानांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचं काम करीत आहेत. करण कुंद्राने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्सनल लाइफबद्दल सांगायचं झालं तर करण कुंद्रा आणि वीजे अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) यांनी 2020 मध्ये 6 वर्षांपासून सुरू असलेलं नातं संपवलं. दोघे बराच काळासाठी लिव्ह-इनमध्ये होते.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Entertainment, Serial

  पुढील बातम्या