'द डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्रीचं निधन; पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूबाबत मोठा खुलासा

'द डर्टी पिक्चर' फेम अभिनेत्रीचं निधन; पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूबाबत मोठा खुलासा

शुक्रवारी कोलकाता स्थित घरी आर्या बॅनर्जीचा मृतदेह आढळला. शुक्रवारी सकाळी घरकाम करणारी महिला आर्या बॅनर्जीच्या घरी पोहचल्यानंतर तिच्या मृत्यूची माहिती मिळाली.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) 'द डर्टी पिक्चर' सह (The Dirty Picture) अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री आर्या बॅनर्जीचं (Arya Banerjee) निधन झालं आहे. शुक्रवारी कोलकाता स्थित घरी आर्या बॅनर्जीचा मृतदेह आढळला. शुक्रवारी सकाळी घरकाम करणारी महिला आर्या बॅनर्जीच्या घरी पोहचल्यानंतर तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. घरकाम करणाऱ्या महिलेने पोलिसांत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आर्याचा मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला आर्याचा मृत्यू, हत्या केल्याने झाल्याचं बोललं जात होतं. परंतु तिच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा झाला आहे.

पोलिसांनी आर्याचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला होता. आता पोस्ट मार्टम (post mortam) रिपोर्ट समोर आला आहे. आर्याच्या ऑटोप्सी रिपोर्टमध्ये, तिची हत्या न झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात दारूचं प्रमाण आढळलं, त्यामुळे कार्डियक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

'आर्या बॅनर्जी लिव्हर सिरोसिसग्रस्त होती. ही हत्या नसून तिच्या पोटात मोठ्या प्रमाणात दारूचं प्रमाण आढळलं' असल्याची माहिती, कोलकाता पोलीस जॉईंट कमिशनर मुरलीधर शर्मा यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी आर्या बॅनर्जीच्या हत्येची बाब नाकारली आहे. मृत्यूवेळी तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात दारू होती. तिला कार्डियक अटॅक आला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत मागण्यासाठी ती चालण्याचा प्रयत्न करत असेल आणि यातच ती खाली पडल्यामुळे जखमी झाली असेल. आर्याच्या शरीरात 2 लीटर दारूचं प्रमाण आढळलं आहे, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 13, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या