श्रीदेवी यांचं पार्थिव खासगी विमानानं आज मुंबईत होणार दाखल

श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 26, 2018 11:49 AM IST

श्रीदेवी यांचं पार्थिव खासगी विमानानं आज मुंबईत होणार दाखल

मुंबई, 26 फेब्रुवारी : खासगी विमानानं बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे. शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणी अहवालावर दुबईत होत असलेली कायदेशीर प्रक्रिया रविवारी वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांचे पार्थिव आज त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवले जाईल आणि त्यानंतरच ते मुंबईत अत्यंदर्शनासाठी आणण्यात येईल. त्यानंतर श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

दरम्यान, श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहत्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे. आज श्रीदेवी यांच्यावर मुंबईत विलेपार्ले पश्चिम इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाचा मोहित मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला. शनिवारी रात्री श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि पडताक्षणी बेशुद्ध झाल्या. त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. याआधी श्रीदेवी यांना हृदयविकाराचा कोणताही आजार नव्हता अशी माहिती श्रीदेवी यांचे दीर संजय कपूर यांनी दिली आहे.

विख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला १९ तास उलटून गेल्यानंतरही अजुन पार्थिव हॉस्पिटलमधून बाहेर आणण्यात आलेलं नाही. दुबईतल्या नियमांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. श्रीदेवी यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टेम पूर्ण झालं असून आणखी काही मेडिकल रिपोर्ट्स येणं बाकी आहे. त्यामुळं पार्थिव रविवारी रात्री नाहीतर सोमवारी सकाळी मुंबईत येण्याची शक्यता असल्याची माहिती दुबईतल्या खलिज टाईम्स या वृत्तपत्रानं दिली आहे.

पार्थिव मुंबईत आणण्यासाठी दुबईतल्या भारतीय उच्चायुक्तालयही मदत करत असून अधिकारी स्थानिक प्रशासन आणि हॉस्पिटलच्या संपर्कात आहेत. दुबईत एखाद्या विदेशी नागरिकाचं निधन झालं असेल तर तिथल्या नियमानुसार पोस्टमार्टेम आणि इतर मेडिकल रिपोर्टेस तपासले जातात. त्याचप्रमाणं पोलीस सर्व शक्यतां तपासून बघतात नंतरच पार्थिव बाहेर येण्याची परवानगी दिली जाते. श्रीदेवी यांचं पार्थिव रात्री उशीरा मुंबई आणण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2018 06:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...