Home /News /entertainment /

The Archies: स्टार किड्सचं लाँचिंग! झोया अख्तरच्या सिनेमाच्या First look नंतर, शाहरुखची मुलगी आणि अमिताभच्या नातवाकडेच सर्वाधिक लक्ष

The Archies: स्टार किड्सचं लाँचिंग! झोया अख्तरच्या सिनेमाच्या First look नंतर, शाहरुखची मुलगी आणि अमिताभच्या नातवाकडेच सर्वाधिक लक्ष

The Archies: स्टार किड्सचा नवा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे.

The Archies: स्टार किड्सचा नवा चित्रपट लवकरच रीलिज होणार आहे.

झोया अख्तर (Zoya Akhtar new film launching star kids) आपल्या हटके चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असते. शाहरुखची मुलगी, श्रीदेवीची धाकटी आणि अमिताभचा नातू यांचं लाँचिंग या सिनेमातून होईल. कोण कुठली भूमिका करणार आणि चर्चा कुणाची तेही कळेल.

पुढे वाचा ...
   मुंबई, 16 मे: झोया अख्तर (Zoya Akhtar) आपल्या हटके चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असते. झोयानं आता एक आगळा-वेगळा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' (The Archies) या रूपांतरित सीरिजचा फर्स्ट लूक (First Look) शनिवारी (14 मे) रिलीज झाला. तेव्हापासून या फर्स्ट लूकची प्रचंड चर्चा सुरू आहे. या सीरिजमधून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda), दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan - shahrukh khan daughter first movie हे अ‍ॅक्टिंग डेब्यू (Acting Debut) करणार आहेत. या तीन सेलिब्रिटी किड्सव्यतिरिक्त या सीरिजमध्ये मिहिर आहुजा, डॉट (Dot), युवराज मेंदा आणि वेदांग रैना हेदेखील आहेत. ज्यांना ओरिजनल कॉमिक सीरिजबद्दल माहिती आहे, त्यांच्या मनात द आर्चीजचा हिंदी लूक बघून उत्सुकता निर्माण झाली आहे. हिंदी रूपांतरणामध्ये कोणता कलाकार कोणता रोल करणार आहे हे जाणून घेण्यासाठी ही उत्सुकता आहे. असं म्हटलं जात आहे, की अगस्त्य नंदा हा आर्ची अँड्र्यूजचा (Archie Andrews) रोल करणार आहे, तर सुहाना वेरोनिका लॉज (Veronica Lodge) आणि खुशी बेट्टी कूपरच्या (Betty Cooper) रोलमध्ये दिसतील. मिहिर आहुजा हा जगहेड जोन्सचा (Jughead Jones) रोल करणार आहे. वेदांग, युवराज आणि डॉटसह इतर कलाकार कोणत्या रोलमध्ये आहेत हे अद्याप उघड झालेलं नाही. द आर्चीजचा फर्स्ट लूक 1960 च्या दशकाची झलक दाखवत आहे. ओरिजनल कॉमिक सीरिजमधलं सेटिंग मोठ्या पडद्यावर जिवंत करण्याचं वचन झोयानं जगभरातील ऑडियन्सला दिलं होतं. झोया आपलं हे प्रॉमिस पूर्ण करत असल्याचं फर्स्ट लूकमधून दिसत आहे. झोया अख्तरच्या टायगर बेबी फिल्म्सच्या (Tiger Baby Films) माध्यमातून पुढील वर्षी नेटफ्लिक्सवर (Netflix) ही सीरिज रिलीज केली जाईल. वाचा -  'मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद' मानसी नाईक केतकी चितळेवर भडकली
   आर्ची कॉमिक्सचं भारतीय रूपांतरण असलेली ही कथा आहे. ही सीरिज म्हणजे तरुणाई, बंडखोरी, फ्रेंडशिप, पहिलं प्रेम या आणि तरुणांशी निगडित असलेल्या सर्व भावना व्यक्त करणारा एक सांगीतिक अनुभव (Musical Experience)आहे.
  शनिवारी आर्चिजचा फर्स्ट लुक शेअर झाल्यापासून, अगस्त्य, सुहाना आणि खुशी या स्टारकिड्सवर बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शाहरुखची मुलगी सुहानानं फर्स्ट बॉलिवूड प्रोजेक्ट (Bollywood Project) हाती घेतल्यानं त्यांनी तिच्यासाठी एक अ‍ॅडव्हाइस नोट शेअर केली आहे. अगस्त्यचा मामा आणि अभिनेता अभिषेक बच्चननं देखील द आर्चीजच्या स्टार कास्टचं अभिनंदन (Congratulations) केलं आहे. खुशी कपूरची मोठी बहीण असलेल्या जान्हवी कपूरनंदेखील संपूर्ण स्टार कास्टला शुभेच्छा दिल्या आहेत. द आर्चीजचं पुढील वर्षी (2023) नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होणार आहे.
  First published:

  Tags: Bollywood, Film star

  पुढील बातम्या