जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवं...' तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनेच्या पलीकडची पोस्ट

'राज ठाकरे यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवं...' तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनेच्या पलीकडची पोस्ट

...' तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनेच्या पलीकडची पोस्ट

...' तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनेच्या पलीकडची पोस्ट

आज मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट भाव खावून जाते. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 जून- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज ठाकरे यांचं मनोरंजन विश्वाशी खूप घट्ट असं नातं आहे, अनेकदा ते कलाकार मंडळीचं कौतुक करताना दिसताता. मराठी सिनेमाबद्दल कोणती अडचण असेल किंव कोणती समस्या यातून मार्ग काढण्याचं काम राज ठाकरे करताना दिसतात. आज मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट भाव खावून जाते. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं राज ठाकरे यांच्यासोबत एक खास फोटो शेअर केला आहे. सोबत त्याला कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की,आदरणीय राजसाहेब ठाकरे,20 वर्ष झाली आपल्या परिचयाला !पण संवाद कदाचित हल्लीच झाला.. तुमचं खुप कौतुक वाटतं मला…इतकं परिपूर्ण व्यक्तिमत्व…राजकारण, संगीत, कला, क्रीडा, इतिहास, common sense आणि मुख्‍य म्‍हणजे सार्वभौम आणि way ahead of time Vision असलेला एकमेव नेता !

News18लोकमत
News18लोकमत

स्वतःच्या हिमतीवर एवढा मोठा डोलारा उभा केला, तो वाढवलात, वृधिंगत केलात…इतकी वर्ष पर्वतासारखे जगलात, अनेक संकटं आली पण कुटुंब प्रमुख बनून एवढी कुटुंब जपलीत, स्वतःचा विचार डगमगू दिला नाहीत, लाचारी पत्करली नाहीत… राजकारणात मैत्री आणली नाही, आणि मैत्रीत राजकारण केलं नाही. So called fast life मध्‍ये तुम्‍ही तुमच्‍या आयुष्‍यात ठेहराव आणलात आणि आमच्‍या मनात अढळ स्‍थान निर्माण केलंत! हा Never Give up Attitude इतका ठासून कसा हो भरलाय तुमच्यात ?राजकारणातल्या एवढ्या अवघड आणि प्रतिकुल प्रवासात अनेकजण तलवारी टाकून देतात, काही ढाल धरून उभे राहतात पण तुम्ही बेदरकारपणे तुमची मतं मांडत गेलात आणि ते आजही चालूच आहे…कारण कर नाही त्याला डर कशाला ! मुख्‍य म्‍हणजे तुमच्‍या जाणिवा अजूनही जिवंत आहेत !तुमच्‍या वाढदिवसानिमित्त एवढं मात्र नक्की म्हणावसं वाटतं..राज ठाकरे ह्यांची महाराष्ट्रात सत्ता नाही हे राज ठाकरेंच नाही तर महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे !!तुमच्‍यासारख्‍या माणसांचा साचा आता देव बनवत नाही आणि अश्या अनोख्या माणसाला जवळून अनुभवण्याचं सुदैव मला लाभलं ह्यसाठी मी स्‍वामींची आभारी आहे.

जाहिरात

देव तुम्हाला दीर्घ आयू देवो आणि वाढदिवसा व्यतिरिक्त शुभेच्छांचा आणि प्रेमाचा पाऊस सदैव तुमच्‍यावर बरसत राहोकोटी कोटी शुभेच्छा आणि प्रेम राजसाहेब

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात