तेजस्विनी पंडित ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ग्लॅमरस लूक आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर जवळपास एक दशक ती चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. (Tejaswini Pandit/Instagram)
तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ती एक डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते. (Tejaswini Pandit/Instagram)
रंगभूमीवरील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची ती मुलगी आहे. पण आईच्या पुण्याईवर काम मिळवण्याऐवजी तिनं स्वत: संघर्ष करण अधिक पसंत केलं. (Tejaswini Pandit/Instagram)
तेजस्विनीनं खडतर प्रवास करुन मनोरंजनसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. एकवेळ अशीही होती जेव्हा आम्ही अडीच महिने अंधारात राहिलो असं तेजस्विनी एका कार्यक्रमात म्हणाली होती. (Tejaswini Pandit/Instagram)
तेजस्विनीनं काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात तिनं भूतकाळातल्या संघर्षमय आठवणी जागवल्या होत्या. (Tejaswini Pandit/Instagram)
“आई त्यावेळी घरातली एकटी कमावती होती. एकावेळी ती चार नाटकांत काम करायची.” (Tejaswini Pandit/Instagram)
“नाटकांतून मिळणाऱ्या पैशांत घर चालायचं. मात्र आईचे सहकलाकार प्रशांत सुभेदार यांचं निधन झाल्यानं ती चारही नाटकं बंद पडली” (Tejaswini Pandit/Instagram)
“एक वेळ अशी आली की घरात फक्त 1 रुपया, मैदा आणि साखर तेवढी शिल्लक राहिली. त्यावेळी त्याच मैद्याची बिस्किटं खाऊन आम्ही दिवस ढकलला होता”, असा कटू अनुभव तिनं कार्यक्रमात सांगितला होता. (Tejaswini Pandit/Instagram)
“कर्जबाजारी झाल्यानं घरात वीजेचं बिल भरायलाही पैसे नव्हते. अडीच महिने आम्ही अंधारात राहिलो. लावणीचे प्रयोग नाईटवेअर कंपनीची जाहिरात करून चांगले पैसे मिळाले. या पैशांतून मी वीजबिल भरलं” (Tejaswini Pandit/Instagram)
तेजस्विनीनं अभिनेता अंकुश चौधरीसोबत पहिली जाहिरात केली. त्यानंतर केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. (Tejaswini Pandit/Instagram)