'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये नवा ट्विस्ट; तुम्ही कधी विचारही केला नसेल असं काहीतरी पाहायला मिळणार !
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये नवा ट्विस्ट; तुम्ही कधी विचारही केला नसेल असं काहीतरी पाहायला मिळणार !
तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta ka Oolthah Chashmah) ही मालिका सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या मालिकेमध्ये 12 वर्षात जे घडलं नाही ते आता दाखवलं जाणार आहे.
मुंबई, 10 ऑक्टोबर: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta ka Oolthah Chashmah) ही मालिका आजकाल सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असते. कधी टीआरपीमुळे तर कधी एखादा कलाकार सोडून जाण्याच्या बातमीमुळे या मालिकेची चर्चा सतत सुरू असते. सध्या अनेक नव-नवीन मालिका टीव्हीवर येत आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेचं स्थान प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ आहे. लवकरच या सीरिअलमध्ये अंजली भाभी (Anjali Bhabi) आणि तारक मेहता (Tarak Mehta) रोमान्स करताना दिसणार आहेत.
सुनैना फौजदार (Sunayana Fozdar) आणि शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांच्यावर नुकतंच एक गाणं चित्रित झालेलं आहे. त्याच्या रोमॅन्टिक गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सीरिअलचा एक भाग दिवंगत गायक एस.पी बालसुब्रमण्यम यांना समर्पित करण्यात आला होता. यावेळी तारक मेहता आणि अंजली मेहता यांनी 'बहुत प्यार करते हैं तुमको सनम' या गाण्यावर छोटासा डान्स केला. सीरिअल सुरू झाल्यापासून तारक मेहता आणि अंजली मेहता यांचा रोमान्स दाखवण्यात आला नव्हता. पहिल्यांदाच या दोन पात्रांवर रोमांटिक गाणं शूट झालं आहे.
मालिकेच्या या विशेष भागात एस.पी बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांची बरसात केली आहे. अंजली भाभी आणि तारक मेहता यांच्या डान्सनंतर अय्यर आणि बबिता या पात्रांवरही 'हम बनें तुम बने एक-दुजे कें लिए' हे गाणं शूट करण्यात आलं आहे. बबिता आणि अय्यरला रोमँटिक गाणं गाताना पाहून जेठालालही बबिताकडे पाहून गाणं म्हणायला सुरुवात करतो, असं दाखवण्यात आलं आहे. जेठलाल बबितासाठी 'हम आपके है कौन' या सिनेमाचं टायटल ट्रॅक गाताना दिसणार आहे. एकूणच तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये येत्या काही दिवसताच आपल्याला झक्कास गाण्यांची मैफल रंगलेली दिसणार आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.