जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोण आहे 'तारक मेहता...'मधील नवी गरबा क्वीन? VIDEO पाहून तुम्हालाही आवडतील हिच्या अदा

कोण आहे 'तारक मेहता...'मधील नवी गरबा क्वीन? VIDEO पाहून तुम्हालाही आवडतील हिच्या अदा

कोण आहे 'तारक मेहता...'मधील नवी गरबा क्वीन? VIDEO पाहून तुम्हालाही आवडतील हिच्या अदा

तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील बबिताजी मुनमुन दत्ताचा (Munmun Dutta) व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 नोव्हेंबर: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’ या सीरिअलचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. ही सीरिअल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या मालिकेतले संवाद, कलाकारांचा अभिनय आणि हलकी फुलकी कथा अशा अनेक पैलूंमुळे ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मुख्य कलाकारांसोबतच इतर कलाकारांचाही स्वतंत्र चाहतावर्ग आहे.या मालिकेमधल्या बबिता (Babita)च्या अदांनी जेठालाल (Jethalal)च काय चाहतेदेखील घायाळ होतात. बबिताजीची भूमिका करणाऱ्या मुनमुन दत्ता (Munmun Dutta)ला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत. मुनमुनही नेहमी सोशल मीडियावर काहीतरी शेअर करत असते. नुकताच मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गरबा खेळताना दिसत आहे. पारंपरिक गुजराती वेषात ती अतिशय देखणी दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत.

जाहिरात

मुनमुन दत्ताने व्हिडीओ सोबत एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. “ज्या क्षणी कॅमेरा सुरू होतो त्याच क्षणी मुनमुनचं बबितामध्ये रुपांतर होतं. शूटिंगच्या वेळी प्रचंड दमल्यामुळे मला ताप आला होता. पण काही हरकत नाही. चांगल्या मेहनतीचं फळ मिळतंच.”

जाहिरात

नवरात्र संपली आहे. पण मुनमुनने शेअर केलेला व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: serials
  • First Published :
जाहिरात
जाहिरात