Home /News /entertainment /

'Taarak Mehta...' फेम दयाबेन कॉलेजकाळात दिसायची अशी, पाहा Disha Vakaniचा थ्रोबॅक फोटो

'Taarak Mehta...' फेम दयाबेन कॉलेजकाळात दिसायची अशी, पाहा Disha Vakaniचा थ्रोबॅक फोटो

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या विनोदी मालिकेतून दयाबेन अर्थातच दिशा वकानी घराघरात पोहोचली आहे.

  मुंबई, 25 जानेवारी-   'तारक मेहता का उल्टा चश्मा'   (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)   या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. गेली 13 वर्षे ही मालिका सर्वांचं मनोरंजन करत आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ही मालिका सर्वांचीच आवडती बनली आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचे आवडते बनले आहेत. त्यातल्या त्यात दयाबेनची   (Dayaben)  प्रसिद्धी फारच जास्त आहे. अभिनेत्री दिशा वकानीने   (Disha Vakani)  ही भूमिका साकारली होती. दयाबेन आपल्या कॉलेजच्या दिवसांत कशी दिसत होती, हे आज आपण पाहणार आहोत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या विनोदी मालिकेतून दयाबेन अर्थातच दिशा वकानी घराघरात पोहोचली आहे. दिशा वकानीने अनेक वर्षे या मालिकेत काम केलं आहे. परंतु गेल्या ४ वर्षांपासून ती मालिकेत दिसलेली नाही. चाहते तिला प्रचंड मिस करतात. प्रेक्षकांना तिच्या परतण्याची अपेक्षा आहे. दरम्यान सोशल मीडियावर दिशा वकानीचे काही थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये दिशा अतिशय स्लिम आणि वयाने लहान दिसत आहे. हे फोटो दिशाच्या कॉलेजच्या काळातील असल्याचं म्हटलं जात आहे. दिशाच्या जुन्या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि फिट दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा जुना लुक पाहून चाहते आनंदी आहेत.
  दिशा वकानीचा जन्म- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत वर्षानुवर्षे सर्वांना खळखळून हसवणारी दयाबेन अर्थातच दिशा वकानी मूळची गुजरातची आहे. गुजरातमधील भावनगरमध्ये तिचा जन्म झाला होता . तिचं बालपण याचठिकाणी गेलं. दिशाने मालिकेतसुद्धा गुजरातीच भूमिका साकारली होती. दिशा वकानी ग्रॅज्युएट आहे. तिनं अभियाचे धडे गिरवले आहेत. तिचं कॉलेज अहमदाबादमध्ये पूर्ण झालं आहे. त्यांनतर दिशाने अभिनय करण्यास सुरुवात केली होती. दिशाने आपल्या अभिनयाची सुरुवात गुजराती चित्रपटांमधून केली होती. त्यांनतर ती हिंदी मालिकांकडे वळली. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. या मालिकेमुळे ती आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. (हे वाचा:दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा कधी करणार लग्न? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा) 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून ब्रेक- दिशा वकानी २०१८ पासून मालिकेत दिसलेली नाही. दिशाने आपल्या प्रेग्नेंसीमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतरसुद्धा ती मालिकेत परतली नाही. त्यामुळे चाहते नाराज आहेत. असं म्हटलं जातं की मानधन आणि शूटिंगची वेळ या मुद्द्यांवरून दिशा आणि निर्मात्यांमध्ये एकमत होत नाहीय त्यामुळे ती मालिकेत परतलेली नाहीय. परंतु तिच्या जागी दुसरी कोणतीही अभिनेत्री आलेली नाही. त्यामुळे दिशा वकानीच परत येणार अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. शिवाय दिशा वकानीला मालिकेत परत आणावं यासाठी चाहते सतत निर्मात्यांना सोशल मीडियावरून आवाहन करत असतात.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma

  पुढील बातम्या