मुंबई, 14 जानेवारी- मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता सुनील होळकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना आरोग्याबाबत विविध समस्या असल्याचं म्हटलं जात आहे.सुनील होळकर हे एक अत्यंत नावाजलेले अभिनेते होते. त्यांनी अनेक मालिकां आणि चित्रपटामधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. सुनील होळकर यांनी मराठी चित्रपट 'गोष्ट एका पैठणीची'मध्येसुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील होळकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना लिव्हर सोरायसिसची तक्रार सुरु होती. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. या काही दिवसांत त्यांची प्रकृती खालावली होती. अशातच 13 जानेवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा जाण्याने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
हे वाचा: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' लवकरच होणार बंद? घसरत्या टीआरपीबाबत रिटा रिपोर्टरने दिलं उत्तर
सुनील होळकर यांनाही 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. त्यांना या शोमुळे एक नवी ओळख मिळाली होती. तसेच पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातसुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका साकारत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अवघ्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने त्यांचे सह कलाकार आणि चाहत्यांना धनिक बसला आहे, सुनील होळकर यांच्या मागे आईबाबा, पत्नी आणि दोन मुले असा मोठा कुटुंब आहे.
सुनील होळकर यांचा शेवटचा मेसेज-
सुनील होळकर यांनी आपल्या मित्राला एक मेसेज केला होता. त्यांचा तो मेसेज शेवटचा ठरला. अभिनेत्याने मित्राला मेसेज करत लिहलं होतं, की हा माझा शेवटचा मेसेज आहे. मी सर्वांना चांगल्या प्रकारे भेटू इच्छितो. सर्वांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तसेच त्यांनी सर्वांची माफीही मागितली होती. त्यांचा हा मेसेज त्यांच्या मित्राने पुढे पोस्ट केला आहे.
सुनील होळकर यांच्या करिअरबाबत सांगायचं झालं तर त्यांनी, अशोक हांडे यांच्या चौरंग नाट्य संस्थानमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. यामध्ये त्यांनी अनेक कामं केली होती. त्यांनी 12 वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूमीवर काम केलं आहे. ते एक उत्तम कथावाचक होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.