अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या आपल्या बहिणीसोबत मालदीवला फिरायला गेली आहे. मालदिवच्या निसर्गरम्य वातावरणातील फोटो तिने शेअर केले आहेत. (फोटो-इन्स्टाग्राम))
बॉलिवूडमधील ताकदीची अभिनेत्री म्हणून तापसीकडे पाहिलं जातं. बॉलिवूडमधील मसाला पटांची चौकट मोडून काढत तापसीने अनेक वूमेन सेंट्रिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अभिनयासोबतच तापसी फिटनेसकडेदेखील लक्ष देते. मालदिव वेकेशनवर असतानादेखील तापसी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढते.
तापसी पन्नूने आजपर्यंत हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु सिनेमातही काम केलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तापसीचा मोठा चाहतावर्ग आहे.
आपल्या उत्तम अभिनयासाठी तापसीला आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अभिनयामध्ये उत्तम करिअर करणाऱ्या तापसीने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करुन अभिनयामध्ये पाऊल टाकलं आहे.