जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोण आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड?'Biggini Shoot'च्या धम्माल व्हिडीओमधून पहिल्यांदाच आला समोर

कोण आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड?'Biggini Shoot'च्या धम्माल व्हिडीओमधून पहिल्यांदाच आला समोर

कोण आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड?'Biggini Shoot'च्या धम्माल व्हिडीओमधून पहिल्यांदाच आला समोर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (taapsee pannu) बिगिनी शूट (Biggini Shoot)चा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओनिमित्त तापसीचा बॉयफ्रेंड पहिल्यांदाच समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मालिदव, 13ऑक्टोबर: अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu)  सध्या मालदिव व्हेकेशनवर आहे. तापसीची बहिण शगुन पन्नू (Shagun Pannu) आणि इवानियासोबत तापसाची धमाल मस्ती सुरू आहे. आपल्या मालदिव व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडीओ तापसी सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. मालदिवमध्ये तापसी सध्या बिगिनी शूट (Biggini Shoot) करताना दिसत आहे. हा बिगिनी शूटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसीसोबत तिचा बॉयफ्रेंड मेथियास बो, बहिणीनींही थिरकताना दिसले. या व्हिडीओनिमित्त तापसीचा बॉयफ्रेंड पहिल्यांदाच या व्हिडीओमधून समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे तब्बल 6 महिने घरात अडकून पडलेली तापसी मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. तापसीच्या या बिगिनी शूटवर नेटकऱ्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत. सामान्य लोकांनीच नाही तर अनुष्का शर्मा, भूमी पेडणेकर,वरुण धवन सारख्या कलाकारांनीही तिच्या व्हिडीओवर कॉमेंट्स केल्या आहेत.

जाहिरात

तापसीचा बॉयफ्रेंड मेथियास बो (Mathias Boe)ने देखील या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मालदिव व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

तपासी लवकरच क्रिकेटर मिताली राजच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. या सिनेमाचं नाव शाबाश मितू असं असेल. या बायोपिक सोबतच रश्मी रॅकेट, लोप लपेटा या सिनेमांमध्ये तापसी झळकणार आहे. ‘लोप लपेटा’ हा सिनेमा रन लोला रन या सिनेमाचा रिमेक आहे. तापसीचे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: maldivs
  • First Published :
जाहिरात
जाहिरात