जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / स्वराज्यरक्षक संभाजी सीरियल आता चित्रपट रूपानं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्यरक्षक संभाजी सीरियल आता चित्रपट रूपानं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

स्वराज्यरक्षक संभाजी सीरियल आता चित्रपट रूपानं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

छत्रपती संभाजी महाराज (Swarajyarakshak Sambhaji) यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित कथानक असलेली मालिका लोकप्रिय ठरली होती. तीच चित्रपटरूपात पुन्हा पडद्यावर येत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 29 एप्रिल: इतिहासातल्या अनेक घटना, प्रसंग तसंच महापुरुषांच्या जीवनावर आधारित सीरियल्स अर्थात मालिका (Marathi Serials) आणि चित्रपट (Cinema) नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशा सीरियल्स आणि चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो. छोट्या पडद्याचा विचार करता रामायण, महाभारत या सीरियल्सचा प्रेक्षकवर्ग आजही कायम आहे. काही वर्षांपूर्वी या सीरियल्स प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड या सीरियल्सनं मोडले होते. अलीकडच्या काळात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित कथानक असलेली स्वराज्यरक्षक संभाजी (Swarajya rakshak Sambhaji) ही झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील सीरियल तुफान लोकप्रिय झाली होती. या सीरियलचं स्थान प्रेक्षकांच्या मनात आजही कायम आहे. स्वराज्यरक्षक संभाजी ही सीरियल पाहायला आजही प्रेक्षकांना आवडतं. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, तसेच त्यांच्या जीवनतल्या वैशिष्टपूर्ण घटना या सीरियलच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडल्या गेल्या. यात प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे (Actor Amol Kolhe) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख भूमिका अत्यंत ताकदीनं साकारली होती. हे या सीरियलचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या सीरियलच्या अनुषंगानं आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या सीरियलचं चित्रपटात रूपांतर करण्यात आलं असून, येत्या एक मेपासून दुपारी 12 वाजता हा चित्रपट प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. marathiserials_official या इन्स्टाग्राम पेजवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. झी मराठी या वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय सीरियल्सपैकी ही एक सीरियल होती. लॉकडाऊनच्या काळातही ही सीरियल प्रक्षेपित होत होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातले प्रसंग, त्यांचे बुद्धीचातुर्य आणि पराक्रम या गोष्टी प्रेक्षकांना या सीरियलच्या माध्यमातून पाहता आल्या. या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारानं आपली भूमिका परिश्रमपूर्वक निभावली होती.

    ‘शेर शिवराज’फेम ईशा केसकर ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट, ‘पावनखिंड’मध्ये साकारलीय महत्वाची भूमिका

    कालानुरूप नेपथ्य, संगीत आदी तांत्रिक बाजू (Technical Sides) देखील खूप परिणामकारक होत्या. त्यामुळे ही सीरियल प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. या सीरियलला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद बघता, आता ही सीरियल चित्रपट स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    जाहिरात

    महाराष्ट्रदिनाच्या निमित्तानं 1 मे पासून मे महिन्यातल्या प्रत्येक रविवारी स्वराज्यरक्षक संभाजी मालिका चित्रपट स्वरुपात प्रेक्षकांना टीव्हीवर पाहता येणार आहे. येत्या रविवारपासून (1 मे) दुपारी 12 वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातल्या घटना, प्रसंग आणि पराक्रम पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात