मुंबई, 8 जानेवारी- मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी नेहमीच चर्चेत असतो. स्वप्निलने चित्रपट, मालिका, वेबसीरिज अशा तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमठविला आहे. स्वप्निल जोशीचा मोठा चाहतावर्ग आहे. स्वप्निलच्या चाहत्यांना नेहमीच त्याच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागून असते. स्वप्निल आपल्या फॅमिलीसोबत फारच धम्माल करत असतो. तो जितका चांगला अभिनेता आहे तितकाच उत्तम बाबादेखील आहे. स्वप्निल आपल्या मुलांसोबत नेहमीच वेळ घालवताना दिसून येतो. दरम्यान स्वप्निल जोशीने आपल्या लेकीसाठी केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.
मराठी अभिनेता स्वप्निल जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. स्वप्निल सतत आपले फोटो आणि व्हिडोओ शेअर करत असतो. अभिनेत्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. स्वप्निल मोकळ्या वेळेत आपल्या मुलांसोबत मजामस्ती करत असतो. तो विविध मजेशीर रील्स आणि व्हिडीओ बनवत असतो. स्वप्निल जोशीला त्याच्या मुलांसोबत धम्माल करतांना पाहणं त्याच्या चाहत्यांना फार आवडतं. अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टला चाहते आणि कलाकार मित्र भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. परंतु स्वप्निलच्या लेटेस्ट पोस्टवर सर्वच भावुक झाले आहेत. पाहूया अभिनेत्याची पोस्ट नेमकी काय आहे.
(हे वाचा:'जीव माझा गुंतला' फेम योगिताने सौरभसाठी इटलीहून आणलं खास गिफ्ट; पाहून तुम्हीही म्हणाल वाह्ह )
स्वप्निल जोशीने काही वेळापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्याच्या लेकीचा आहे. व्हिडीओमध्ये स्वप्निलची मुलगी मायरा दिसून येत आहे. विशेष म्हणजे मायराने यामध्ये पारंपरिक काठापदराची साडी परिधान केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत स्वप्निलने, स्वप्निलने 'अचानक मोठी झाली यार'. असं कॅप्शन दिलं आहे. यामधून स्वप्निलने प्रत्येक मुलीच्या वडिलांच्या मनाची व्यथा मांडली आहे. मुली अशाच बघता बघता मोठ्या होतात आणि एकेदिवशी सासरी निघून जातात. स्वप्निलचा हा व्हिडीओ पाहून सर्वच भावुक होत आहेत.
View this post on Instagram
स्वप्निल जोशीच्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबतच सेलिब्रेटी मित्रांनीही कमेंट्स करत मायरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री समिधा गुरुन कमेंट करत, 'माझी माय ती... दृष्ट काढ रे' असं म्हणत प्रेम व्यक्त केलं आहे. तर दिग्दर्शक संजय जाधव यांनी उफ्फ... असं म्हंटल आहे. तर मंजिरी ओकने हार्ट इमोजी शेअर करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. स्वप्निल जोशीला 2 अपत्ये आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यात मुलीचं नाव मायरा आणि मुलाचं नाव राघव असं आहे.
सध्या स्वप्निल जोशी झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेमध्ये काम करत आहे. फारच कमी वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांना ही हटके लव्हस्टोरी फारच भावलेली दिसून येत आहे. यामध्ये स्वप्नील जोशीसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री शिल्पा तुळसकर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.