मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वप्निल जोशी अडकला एलिझाबेथच्या जाळ्यात; पोस्ट वाचून तुमचाही उडेल थरकाप

स्वप्निल जोशी अडकला एलिझाबेथच्या जाळ्यात; पोस्ट वाचून तुमचाही उडेल थरकाप

सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल आता एक भयपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बळी (Horror Movie Bali) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल आता एक भयपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बळी (Horror Movie Bali) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल आता एक भयपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बळी (Horror Movie Bali) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे.

  • Published by:  Mandar Gurav
मुंबई 12 मार्च: स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आजवर मुंबई-पुणे-मुंबई, मितवा, तू हि रे, दुनियादारी यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांमधून आपला रोमँटिक अंदाज दाखवणारा स्वप्निल आता एक भयपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बळी (Horror Movie Bali) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. स्पप्निलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मोशन पोस्टर शेअर करुन या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरमध्ये एका रक्तानं माखलेल्या एका व्यक्तीचा फोटो दिसत आहे. हा फोटो पाहून प्रेक्षकांना नक्कीच भीती वाटेल. या पोस्टवर त्यानं “धोका कोणत्याही कोपऱ्यातून होऊ शकतो. एलिझाबेथ कोणत्याही कोपऱ्यातून येऊ शकते. सावध राहा. आता कोण ठरणार तिचा बळी? बळी लवकरच येत आहे.” अशी कॉमेंट लिहून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया यानं केलं आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार या दोघांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली. हा चित्रपट येत्या 16 एप्रिल 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. अवश्य पाहा - ‘माझ्यासोबत डेटवर येणार का?’; तरुणाला पाहून जान्हवी कपूर पडली प्रेमात
View this post on Instagram

A post shared by (@swwapnil_joshi)

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक विशाल फुरिया म्हणाला, “माझ्या लपाछपी या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परिणामी मी हॉरर जॉनरामध्येच आणखी काम करण्याचा निर्णय घेतला. अन् आती मी बळी हा चित्रपट घेऊन आलोय. अर्जुन आणि कार्तिक यांच्यासारखे उत्तम निर्माते या माझ्या दुसऱ्या हॉरर चित्रपटाला लाभले आहेत. या चित्रपटासाठी मला स्वप्निलसारखा स्टार मिळाला आहे. त्याला मराठी प्रेक्षकांकडून नेहमीच चांगले प्रेम मिळाले आहे. मला असे वाटते की, एक अभिनेता म्हणून स्वप्नीलची प्रतिभा आतापर्यंत म्हणावी तशी वापरली गेली नाही. त्याला भेटल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की, तो या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. त्याशिवाय तो एक स्टार आहे आणि त्यामुळे आमचा हा चित्रपट सर्वसामान्यापर्यंत पोहोचायला मदतसुद्धा होईल. ‘बळी’ हा ‘लपाछपी’पेक्षाही अधिक भीतीदायक आणि थ्रिलिंग असेल, अशी हमी मी प्रेक्षकांना देवू शकतो.”
First published:

Tags: Marathi entertainment, Movie release, Movie shooting, Swapnil joshi

पुढील बातम्या