जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नवऱ्याला पुरस्कार मिळाला नाही म्हणून सुयशसाठी आयुषीनं केलं असं काही, Video होतोय Viral

नवऱ्याला पुरस्कार मिळाला नाही म्हणून सुयशसाठी आयुषीनं केलं असं काही, Video होतोय Viral

नवऱ्याला पुरस्कार मिळाला नाही म्हणून सुयशसाठी आयुषीनं केलं असं काही, Video होतोय Viral

आपल्या नवऱ्याचा पडलेला मूड कसा बदलायचा हे आयुषीकडून शिकायला पाहिजे. सुयशनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांनी देखील आयुषीचा हा व्हिडिओ पाहून तिचं कौतुक केलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 4 मार्च- अभिनेता सुयश टिळक सोशल मिडियावर प्रचंड सक्रीय असतो. सुयशसोबत त्याची बायको आयुषी भावे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. दोघंही एकमेकांसोबतचे भन्नाट रील्स तसेच रोमॅंटिक व्हिडिओ देखील शेअर करत असतात. आपल्या नवऱ्याचा पडलेला मूड कसा बदलायचा हे आयुषीकडून शिकायला पाहिजे. सुयशनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांनी देखील आयुषीचा हा व्हिडिओ पाहून तिचं कौतुक केलं आहे. सुयशला एका पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नामांकन मिळालं होतं. पण सुयशला विजेतेपदावर मात्र नाव कोरता आले नाही. त्यामुळे सुयश काहीसा निराश झाला असणार. नवऱ्याचं मन ओळखत तेव्हा आयुषीनं त्याच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केलं होतं. तिनं सुयशसाठी घरात ठिकठिकाणी चिठ्ठ्या लावून त्यावर खास संदेश लिहिला होता. सोनाली कुलकर्णी दिसणार रणरागिणी ताराराणींच्या भूमिकेत; अंगावर काटा आणणारा टीझर सुयशने घरातला व्हिडिओ पोस्ट करत बायकोसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यानं म्हटलं आहे की, हे खूप स्पेशल आहे. मी काल रात्री कोणताही पुरस्कार जिंकला नाही पण माझ्या पत्नीने सुंदर सरप्राईज नोट्स बनवल्या आणि खूप प्रेमाने माझे घरी स्वागत केले. धन्यवाद आयुषी हे फार सुंदर जग आहे. मी यासाठी किती भाग्यवान हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.. फिर से दिल जीत लिया..हे पोस्ट करण्याचं कारण म्हणजे आज मला जाणवलेली गोष्ट शेअर करणं म्हणजे तुम्हाला तुमचं काम प्रामाणिकपणे आणि प्रेमाने करत राहायचं आहे. आणि तुमच्या कुटुंबाचं तुमच्यावर जे प्रेम आहे त्या प्रेमाची प्रशंसा करा.

जाहिरात

हे प्रेम ओळखा आणि त्याचा आदर करा. मी हे सर्व पाहून भारावून गेलो आणि मला वाटले की, तुमच्या प्रिय व्यक्तींच्या या छोट्याश्या कृती तुम्ही जगाच्या शिखरावर आहेत याची जाणीव करून देतात. हे कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे. तुम्ही कोण आहात हे जगाने तुम्हाला सांगितले नाही पाहिजे. विश्वास ठेवा. आपण स्वत:ला चांगले ओळखतो..अशी काही सुयशनं बायकोचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

सुयशच्या यो पोस्टवर सेलेब्सह चाहत्यांनी देखील कौतुक केलं आहे. सुयशची बायको आयुषी देखील अभिनेत्री आहे. याशिवाय ती उत्तम डान्सर देखील आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात