मुंबई 13 ऑगस्ट: सर्व गोष्टींचं सोंग करता येतं पण पैशांचं सोंग करता येत नाही असं म्हटलं जातं. अर्थात हे खरं आहे. कारण आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैसे लागतातच. (Unemployment) परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना नोकरी गेली? किंवा व्यवसाय ठप्प पडला तर? अशा वेळी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर लवकरच जॉबलेस (Jobless) या सीरिजमधून मिळणार आहे. तरुणांच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही सीरिज लवकरच प्लॅनेट मराठी या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
जॉबलेस या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता सुव्रत जोशी मुख्य भूमिका साकारताना दिसतोय. महामारीच्या कठीण काळात सुव्रत 'जॉबलेस' का होतो.. पैसे मिळवण्यासाठी तो वाईट मार्गाचा अवलंब करतो का.. या अडचणीतून तो बाहेर येतो का... असे अनेक अनुत्तरित प्रश्न 'जॉबलेस'मधून उलगडणार आहेत.
सेल्फी घेता-घेता केलं KISS; पाहा जास्मिन भसीनसोबत काय घडलं
'जॉबलेस' बद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात की, “सद्यस्थितीवर आधारित ही वेबसीरिज आहे. करोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. हा ज्वलंत विषय 'जॉबलेस' या सीरिजमधून मांडण्याचा प्रयत्न केला. नोकरी गेल्याने अनेक जण तणावपूर्ण जीवन जगत आहेत आणि त्यातूनच मग चुकीचे पाऊल उचलले जाते. एक चूक सावरताना हातून अनेक चुका होतात आणि संपूर्ण आयुष्य बदलून जाते. या कठीण परिस्थितीवर भाष्य करणारी ही सीरिज आहे. यातून प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी बोध मिळेल. 31 ऑगस्टपासून अतिशय अल्प दरात सीरिज पाहता येणार आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: OTT, Unemployment, Web series