प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं 14 जून 2020 मध्ये आत्महत्या केली होती. या धक्कादायक घटनेला आता एक वर्ष पुर्ण झालं आहे.
सुशांतच्या मृत्यूमुळं अनेकांना जबरदस्त धक्का बसला. तो आत्महत्या करुच शकत नाही, असं मत अनेक नामांकित कलाकारांनी नोंदवलं होतं.
त्यामुळं चाहत्यांच्या आग्रहाखातर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु करण्यात आली. सुरुवातीला मुंबई पोलिसांद्वारे या प्रकरणी तपास सुरु होता.
त्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंड, सीबीआय आणि आता एनसीबीद्वारे प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येचं नेमक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सुशांत मृत्यू प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती संशयीत आरोपी आहे. तिनं अंमली पदार्थांचं व्यसन लावून त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं असा आरोप तिच्यावर केला जात आहे.
या प्रकरणी NCB नं तिला व तुचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना अटकही केली होती. या अटकेनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं. आणि आणखी काही नव्या अभिनेत्रींची नावं समोर आली.
सुशांत मृत्यू प्रकरण सध्या अंमली पदार्थांभोवती फिरत आहे. NCB द्वारे त्याची जोरदार चौकशी केली जात आहे. मात्र सुशांतच्या आत्महत्येमागे कोणाचा मेंदू होता का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एम्स रुग्णालयामधील टीमने दिलेल्या रिपोर्टनुसार सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळण्यात आला. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.
सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.
या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तर अद्याप सीबीआयला मिळालेली नाहीत. शिवाय सुशांत आत्महत्येसाठी प्रवृत्त का झाला होता? याचंही कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.