मुंबई, 17 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. सुशांतनं 14 जून रविवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधला घराणेशाहीच्या वाद पुन्हा वर आला. मागच्या 6 महिन्यात सुशांतकडून 7 सिनेमे काढून घेतल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सलमान खान, करण जोहर सारख्या प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगी सूरज पंचोली आणि सुशांत यांच्यात वाद असल्याचं बोललं जात आहे.
सूरज पंचोली आणि सुशांत यांच्यात तणावपूर्ण संबंधं असल्याचं बोललं जात होतं. पण स्वतः सूरजनं यावर स्पष्टीकरण देत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, मी काही आर्टिकल वाचले ज्यात लिहिलं होतं की, माझे सुशांतसोबत वाद होते. पण हे सत्य नाही आहे. सुशांत माझ्यापेक्षा मोठा होता. कामाच्या बाबतीतही तो माझा सिनियर होता. त्यामुळे मला नेहमीच त्याच्याबद्दल आदर आहे. पण आमच्यात कोणतेही वाद नव्हते. त्याच्याशी माझं भावाचं नातं होतं. अनेकदा त्यानं मला चांगले सल्ले सुद्धा दिले आहे.
सूरजनं पुढे लिहिलं, मला माहित नाही लोकं अशा अफवा का पसरवत आहेत. पण हे बंद व्हायला हवं. माझ्याकडे त्यासोबतच्या कोणत्याही कटू आठवणी नाही. जो वेळ आम्ही एकमेकांसोबत घालवला त्यात केवळ त्यानं मला खूप चांगल्या आठवणीच दिल्या आहेत. त्यामुळे कृपया अशाप्रकारच्या अफवा परसवणं बंद करा. हे खूप दुःखद आहे आणि जी व्यक्ती आता आपल्यात नाही त्याच्याबद्दल असं बोलणं खूर चुकीचं आहे.
सूरज पंचोली त्याच्या सिने करिअर पेक्षा जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे खूप चर्चेत राहिला होता. जिया खाननं 7 वर्षांपूर्ण आत्महत्या केली होती. पण त्यापूर्वी तिनं सुसाइड नोट लिहिली होती. ज्यात तिनं तिच्या डिप्रेशनला सूरज पंचोली जबाबदार असल्याचं आणि त्यातूनचं आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं होतं. जियानं आत्महत्या करण्याआधी सूरज आणि जिया रिलेशनशिपमध्ये होते.