मुंबई, 17 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी 15 जूनला आत्महत्या करत जीवन संपवलं. त्याच्या या अशा अचानक जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. पण यासोबतच बॉलिवूड पुन्हा एकदा घराणेशाहीचा वाद सुरू झाला आहे. ज्याद्वारे सोशल मीडियावर करण जोहर, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींना सुशांतच्या आत्महत्येला जबाबदर धरत ट्रोल केलं जात आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीबद्दल, कंगना रणौत, अभिनव कश्यप रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी भाष्य केलं आहे. त्यानंतर आता सलमान खान, करण जोहर यांच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामुळे निर्माती एकता कपूरला राग आनावर झाला आहे.
सुशांतनं नैराश्यात असताना आत्महत्या केली असं बोललं जात आहेत. याशिवाय छिछोरे सिनेमाच्या रिलीजनंतर त्याच्याकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते. ज्यामुळे त्याला डिप्रेशन आलं होतं. असं बोललं जात आहे. त्यामुळे सुशांतला अपमानास्पद वागणूक देत त्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, अभिनेता सलमान खान आणि निर्माती एकता कपूर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यावर एकता कपूरनं संताप व्यक्त केला आहे.
एकतानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं म्हटलं, 'सुशांतला मी स्वतःच टीव्ही शोमधून लॉन्च केलेलं असतानाही माझ्या विरोधात अशाप्रकारची तक्रार दाखल केल्याबद्दल धन्यवाद. या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे. फॅमिली आणि चाहत्यांनी शांत राहावं, सत्य लवकरच समोर येईल.' एकताच्या या पोस्टवर अनेक टीव्ही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात एकाताच्या विरोधात अशी तक्रार करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांतनं त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. होती. मात्र त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं ते 'कई पो छे' या सिनेमातून. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमानं लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरावर नेऊन ठेवलं होतं. अगदी अलिकडच्याच काळात रिलीज झालेला त्याचा 'छिछोरे' हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता.