मुंबई, 15 जून: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनामुळं आजही त्याचे कित्येक चाहते दु:ख व्यक्त करतात. बॉलिवूडमधील एक हिरा गमावल्याची खंत सर्वांनाच आहे. 34 वर्षीय सुशांत 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरी मृतावस्थेत आढळला होता. सुशांतच्या मृत्यूच्या एका वर्षानंतरही त्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक अनुत्तरीत राहिलेले प्रश्न पुन्हा शोधले जात आहेत. एका अहवालानुसार, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने (AIIMS) खात्री केली आहे की, सुशांतच्या मृत्यूमागील आत्महत्या हेच कारण होते. तसेच त्याची आत्महत्या सकाली 10.10 झाली होती असेही सांगण्यात आले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेंन्सिक पथकाला त्यांच्या तपासात असं आढळलं की, सुशांतने त्यावेळी मद्यपान केले नव्हते किंवा त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. अहवालात म्हटले आहे की, सुशांतने 14 जून 2020 रोजी सकाळी 10:10 वाजता आत्महत्या केली. त्या अगोदर सकाळी साडेनऊ वाजता त्यानं एक ग्लास पाणी आणि डाळिंबाचा रस प्यायला होता. सुशांतनं या दोन्ही गोष्टी त्याच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीकडून मागितल्या होत्या. फॉरेन्सिक तपास पथकाचे नेतृत्व करणारे एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता म्हणाले की, ‘आम्ही आमचा अहवाल सीबीआयकडं सादर केला आहे. एम्सचे वैद्यकीय पथकाने मुंबईत जाऊन आत्महत्या झालेला सर्व प्रकार रिक्रिएट करून पाहिला. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं त्यांची सखोल चौकशी केली असता सुशांतच्या मृत्यूचे कारण हे श्वास गुदमरल्यानं (Asphyxiation) म्हणजेच आत्महत्या असल्याचे निदर्शनास आले.
(फाइल फोटो)
सुशांतच्या आत्महत्येची आधी मुंबई पोलीस, मग इन्कम टॅक्स, पुढे सीबीआय आणि आता NCB द्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही संशयीत आरोपी आहे. तिनं आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुशांतला ड्रग्स देऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. शिवाय ड्रग्ज प्रकरणी तिला अटकही करण्यात आली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिची चौकशी सुरु आहे. या चौकशीत तिनं अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली. सध्या तिनं केलेल्या दाव्यांची उलट तपासणी केली जात आहे. हे वाचा - शाहरुखच्या DDLJ मुळे बदललं होतं सुशांतचं आयुष्य; वाचा काय आहे तो किस्सा काल सुशांतच्या आत्महत्येला एक वर्ष झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला आदरांजली वाहत त्याच्या आठवणी शेअर केल्या. अनेकांच्या स्टेटसवर सुशांत दिसत होता. अनेकांना त्यानं आत्महत्या केली असेल यावर विश्वासच बसत नाही.