नवी दिल्ली, 26 जुलै : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पोलीस सातत्याने मोठमोठ्या व्यक्तींची चौकशी करीत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत कास्टिंग निर्देशक मुकेश छाबडा, यशराज फिल्मचे अध्यक्ष आदित्य चोपडा, वायआरएफचे कास्टिंग निर्देशक शानू शर्मा, फिल्म समीक्षक राजीव मसंदसह अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली आहे.
आताच मिळालेल्या माहितीनुसार पोलीस धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता यांची चौकशी करणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी अपूर्वा मेहता यांना समन्स पाठविला आहे. वृतसंस्था एएनआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
Sushant Singh Rajput death case: Apoorva Mehta, the CEO of Dharma Productions, has been summoned by Mumbai Police.
— ANI (@ANI) July 26, 2020
मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिला समन्स पाठविला होता. कंगनाच्या कायदेविषयक टीमने याचं प्रत्युत्तर दिलं आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी (Sushant Singh Rajput Suicide)मुंबई पोलीस आता हाय प्रोफाइल व्यक्तींची चौकशी करणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांना मुंबई पोलीस लवकरच चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ANI शी बोलताना सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. पोलीस लवकरच दिग्दर्शक महेश भट्ट यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. तसेच दिग्दर्शक करण जोहरच्या मॅनेजरची देखील चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास पोलीस करण जोहर यांना देखील चौकशीसाठी बोलावू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karan Johar, Sushant Singh Rajput