सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली? महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय

सुशांतच्या डायरीतील पानं कुणी फाडली? महत्त्वाचे पुरावे मिटवल्याचा संशय

सुशांत सिंह राजपूतच्या डायरीतून (sushant singh rajput diary) अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत त्याच्या पर्सनल डायरीतून (sushant singh rajput diary) खूप मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सुशांतची डायरी जप्त केली होती. ही डायरी आता सीबीआयच्या हाती लागली आहे. मात्र आता सुशांतच्या डायरीची काही पानं फाडल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे.

सुशांत नियमित डायरी लिहायचा. याबाबत त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकितानेही माहिती दिली होती. वर्तमानातील नोंदी आणि भविष्यातील त्याची स्वप्नं या डायरीमध्ये होती. शिवाय काही आर्थिक बाबीच्या नोंंदी असल्याचीदेखील माहिती मिळते आहे. त्यामुळे सीबीआय तपासात सुशांतची ही डायरी खूप महत्त्वाची आहे.

सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांनीदेखील या डायरीचा उल्लेख केला होता. या डायरीतून अनेक खुलासे होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र या डायरीतील काही पानं गायब आहेत. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार या डायरीत एका नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतरची पानं गायब असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - EXCLUSIVE : रियाच्या भावाच्या बँक खात्यावरून महत्त्वाची माहिती आली समोर

जूनमध्ये मुंबई पोलिसांनी सुशांतच्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या. त्यावेळी पोलिसांना बरीच माहिती मिळाली. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली. कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या होत्या.

दरम्यान सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे.  New18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या खात्यातून थेट शौविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं.

हे वाचा - सुशांत सिंहची हत्या झाल्याचं म्हणता मग पुरावे का देत नाहीत, रोहित पवारांचा सवाल

दरम्यान न्यूज18 च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या 2 प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिची बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

Published by: Priya Lad
First published: August 7, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading