आज सर्वत्र 'डॉटर्स डे' साजरा केला जात आहे. सर्वसामान्य लोक असो वा कलाकार सर्वांना आपल्या लेकीचं तितकंच कौतुक असतं. आज अनेक कलाकार आपल्या लेकींचे जुने फोटो शेअर करत, आपल्या आठवणी ताज्या करत आहेत.
मराठीतीळ ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लाडक्या मुलीचे जुने फोटो शेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सुप्रिया पिळगांवकर आणि सचिन यांना श्रिया ही लाडकी कन्या आहे.
सचिन आणि सुप्रिया यांची एकुलती एक लेक श्रियासुद्धा एक अभिनेत्रीच आहे, आपल्याला माहितीच आहे. श्रिया आणि सुप्रिया यांच्यात खूप खास नातं आहे. या मायलेकी कमी आणि मैत्रिणी जास्त वाटतात. या दोघेही सतत एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात.
सुप्रिया यांनी श्रियाच्या बालपणाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये श्रिया खूपच गोड दिसत आहे. कधीही न पाहिलेले श्रियाचे हे फोटो पाहून चाहते जाम खुश आहेत. सुप्रिया आणि सचिनजी सतत आपल्या मुलीसोबतचे सुंदर फोटो शेअर करत असतात.
श्रियाने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. यामध्ये तिचे सचिन पिळगांवकर हेच तिचे ऑनस्क्रीन बाबा होते. यामध्येसुद्धा बापलेकीचं अनोखं नातं दाखवण्यात आलं होत. श्रिया आज अनेक भाषांमध्ये अभिनय करत आहे. स्टिच ती वेबसीरिजमध्येही दिसून येत आहे.
नुकताच सचिन आणि सुप्रिया यांनी श्रियासोबत वेळ घालवण्यासाठी गोवा ट्रिपचं नियोजन केलं होतं. कारण श्रिया शूटिंगनिमित्त गोव्यात होती. या ट्रिपचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.