सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पाहा VIDEO

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दरबार' हा चित्रपट नव्या वर्षात चार भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर: सुपरस्टार रजनीकांत सध्या आपल्या आगामी सिनेमा 'दरबार' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 'दरबार' चित्रपटाची सध्या तुफान चर्चा होत सुरू आहे. थलाइवाचा प्रत्येक चित्रपट तितकाट सुपरहिट होतो. त्यामुळे 'दरबार' सिनेमात रजनीकांत प्रेक्षकांसाठी काय नवीन कथा घेऊन येणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सोमवारी संध्याकाळी सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'दरबार' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. यामध्ये रजनीकांत यांचा वेगळा आणि हटके अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या लूकची तर सिनेमा इंडस्ट्रीमध्ये सध्या तुफान चर्चा सुरू आहे. या चित्रपटात ते पोलिसाची भूमिका निभावणार आहेत. रजनीकांत यांची दरवेळी प्रमाणे या चित्रपटात धमाकेदार एन्ट्री आणि सुपरकुल लूक असणार याबाबत शंकाच नाही.

रजनीकांत यांचा पोलिसांचा हटके लूक आणि स्टाईलवर चाहते फिदा झाले आहेत. दरबारचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर लो कमेंट आणि लाईक्स आल्या होत्या. त्यावरून हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते किती उतावळे झाले आहेत हे लक्षात येईल.

या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा, प्रतीक बब्बर आणि सुनील शेट्टी एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. स्पायडर, सरकारसारखे चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर आता वेगळ्या धाटणीचा चित्रपट मुरुगदास प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. दरबार चित्रपटाचं ए.आर. मुरुगदास दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे ह्या चित्रपटात अॅक्शन, रोमान्स, थ्रिल, राजकारण पाहायला मिळणार का असा कयास लावला जात आहे.

रजनीकांत यांच्या सिनेमाची जबरदस्त क्रेझ लोकांमध्ये आहे. फक्त तमिळ, तेलगू, मल्याळमच नाही तर बॉलिवूडमध्येही ही क्रेझ आहे. या चित्रपटात रजनीकांत पोलिसांची भूमिका साकारत आहे. या निमित्ताने तब्बल 27 वर्षांनंतर रजनीकांत खाकी वर्दीत दिसणार आहेत. दरबार हा रजनीकांत यांचा 169वा चित्रपट असून या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक अति लोकप्रिय झालाय. हा चित्रपट दक्षिणेकडील राज्यांमध्ये 9 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे.

First published: December 16, 2019, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading