सनी लिओनी आणि तिचा नवरा डॅनिअल वेबर मागच्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या दोघांच्या लग्नाला आता 9 वर्षं झाली आहेत आणि या दोघांना निशा, अशर आणि नोआह ही 3 मुलं सुद्धा आहेत.
आपल्या वैवाहिक जीवनात सनी खूप खूश आहे. पण सनी आणि डॅनिअल यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. पण या कपलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं तिच्या पतीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सनीनं तिच्या आणि डॅनिअलच्या पहिल्या भेटीविषयी सांगितलं. यावेळी मला माझा नवरा समलैंगिक समजत होता असा धक्कादायक खुलासा करत सनीनं यामागचं कारणही स्पष्ट केलं.
सनी सांगते, मी त्यावेळी लास वेगासमध्ये माझ्या मैत्रिणीसोबत होते. आम्ही दोघी डॅनिअलच्या बँडमेटला भेटायला जात होतो. त्यावेळी मला कॉमेडियन आणि अभिनेता पॉली शोर सोबत डेटवर जायचं होतं मात्र त्यानं मला फसवलं.
यावेळी डॅनिअलनं सांगितलं की, आम्ही रस्त्यातच पॉलीला भेटलो आणि तो त्यांच्या एका मित्राला भेटायला निघून गेला आणि अशाप्रकारे देवानं माझी आणि सनीची भेट घडवून आणली. हे माझं भाग्य होतं.
डॅनिअलच्या या खुलाशानंतर सनीनं सांगितलं की, जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळी डॅनिअल मला समलैंगिक समजत होता आणि त्याला कारणही होतं.
सनीनं सांगितलं, माझ्यासोबत असलेली माझी मैत्रीण लेस्बियन होती आणि ती नेहमीच मुलांसारखे कपडे घालत असे. तिनं माझा हात पकडला होता. त्यामुळे डॅनिअलनं त्याचा वेगळाच अर्थ घेतला.
सनी लिओनीनं वयाच्या 19 व्या वर्षापासून अडल्ट सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. पण नंतर तिनं ही इंडस्ट्री सोडून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र या सर्व प्रवासात डॅनिअल नेहमीच तिच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला.