मुंबई, २० जानेवारी २०१९- जवळपास चार वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर असलेला सुनील शेट्टी आता पुनरागमन करायला सज्ज झाला आहे. सुनीलने नुकतेच आगामी सिनेमातील त्याचा लूक शेअर केला आहे. हे फोटो पाहून त्याचा आगामी सिनेमा बाहुबलीला टक्कर देईल असेच वाटते.
View this post on Instagram“Marakkar“ The Lions of the Arabian Sea. Directed by my all time favourite Priyadarshan!!
प्रियदर्शनचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात सुनील शेट्टी १६ व्या शतकातील सैनिक दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचं नाव मरक्कड- द लायन ऑफ अरेबियन सी असं आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून या सिनेमातून सुनील आणि प्रियदर्शन तब्बल १० वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. दे दना दन सिनेमात त्यांनी शेवटचं काम केलं होतं.
या सिनेमात सुनीलला १६ व्या शतकातील एका योध्याप्रमाणे लढायचे आहे. यत तलवारबाजीपासून घोडेस्वारीही करताना तो दिसणार आहे. सिनेमात त्याच्यासोबत प्रभुदेवा आणि मोहनलाल यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचं सुरुवातीचं बजेट १५० कोटी रुपये आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून एप्रिलपर्यंत चित्रीकरण पूर्ण करण्याचा टीमचा मानस आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.
हा सिनेमा फक्त हिंदीत नसून तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही दाखवण्यात येणार आहे. सिनेमाची कथा नेवी चीफ मोहम्मद अली उर्फ कुनाजी मरक्कड चतुर्थच्या आयुष्यावर आधारीत आहे.
Special Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali